Adhyatmik; ईश्वर भक्ती म्हणजेच नामस्मरण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 03:21 PM2019-01-19T15:21:08+5:302019-01-19T15:29:42+5:30

ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे. नामस्मरणामुळे परमशांती ...

God's devotion is namely ...! | Adhyatmik; ईश्वर भक्ती म्हणजेच नामस्मरण...!

Adhyatmik; ईश्वर भक्ती म्हणजेच नामस्मरण...!

Next

ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे. नामस्मरणामुळे परमशांती मिळते. निरंतर नामस्मणामुळे कुळाची परंपरा शुध्द होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ-वेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उध्दरून जातात. एकाच नामस्मरणाची शेकडो -हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो. तसेच सदगुरुंची भक्ती करणारा सदगुरु रुप होतो.

असे आहेत देवदेवतांचे नामजप...

  • शिवाचा नामजप -

ॐ नम: शिवाय । हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी नम: या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा. या वेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.

  • श्रीरामाचा नामजप -

श्रीराम जय राम जय जय राम । हा नामजप करतांना तारक भाव येण्यासाठी नामजपातील पहिल्यांदा येणारा ह्यजय रामह्ण व त्यानंतरचा ह्यजय जयह्ण मधील दुसरा ह्यजयह्ण हे शब्द म्हणतांना त्यांवर जोर न देता ते हळुवारपणे उच्चारावेत व त्या वेळी ह्यश्रीरामा, मी तुला पूर्णत: शरण आलो आहेह्ण, असा भाव ठेवावा.

  • मारुतीचा नामजप -

' हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट ' हा नामजप हनुमंता साठी करावा. लंकेत राक्षसांचा नाश करणारा मारुति. देवतेप्रति सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो, तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.

ॐ गं गणपतये नम: । (श्री गणेशाय नम:) हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी नम: या शब्दावर जोर न देता तो हळुवारपण म्हणावा. या वेळी आपण श्रीगणेशाला साष्टग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.

  • दत्ताचा नामजप -

श्री गुरुदेव दत्त । या नामजपातील गुरुदेव हा शब्द म्हणतांना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा आणि ह्यगुरुदेव या शब्दानंतर थोडा वेळ थांबून दत्त हा शब्द म्हणावा.

  • श्रीकृष्णाचा नामजप -

ॐ नमो भगवते वासुदेवाय । या नामजपातील ह्यनमोह्ण हा शब्द म्हणतांना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा. भगवते या शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर वासुदेवाय हा शब्द म्हणावा.

हे आहेत नामस्मरणाचे फायदे...

  • -  एकाग्रता वाढते
  • - चित्तशुद्ध होते
  • - वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते
  • - दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही.
  • - मन कायम आनंदी राहते.
  • - सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात.

- ह.भ.प सुखदेव कृष्णात धारेराव महाराज,
सोलापूर.

Web Title: God's devotion is namely ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.