ईश्वराचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 02:57 AM2018-11-19T02:57:49+5:302018-11-19T02:57:59+5:30

खूप लोकांना असे वाटते की ‘सद्गुरू’ ही एक उपाधी आहे, पण खरं तर ती एक व्याख्या आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला सद्गुरू असे म्हणता, त्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही त्यांच्याकडे धर्मग्रंथ समजून घेण्यासाठी जात नाही.

The experience of God | ईश्वराचा अनुभव

ईश्वराचा अनुभव

Next

-सद्गुरू जग्गी वासुदेव

प्रश्न : सद्गुरू, नमस्कार. मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहे. माझी पहिली शंका अशी आहे की, तुम्ही कधी ईश्वर अनुभवला आहे का?
सद्गुरू : खूप लोकांना असे वाटते की ‘सद्गुरू’ ही एक उपाधी आहे, पण खरं तर ती एक व्याख्या आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला सद्गुरू असे म्हणता, त्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही त्यांच्याकडे धर्मग्रंथ समजून घेण्यासाठी जात नाही. कारण त्यांनी कोणतेही धर्मग्रंथ वाचलेले नाहीत. तुम्हाला स्वर्गात जाण्याची इच्छा आहे म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जात नाही. ते तिथे गेलेले नाहीत आणि त्यांना तिथे जाण्यातही काही रस नाही.
सद्गुरू याचा शब्दश: अर्थ आहे ‘जो आतून प्रकट होतो.’ माझं जीवन हे पूर्णपणे, त्याच्या आरंभापासून अंतापर्यंत सविस्तरपणे मला माहीत आहे. आणि केवळ एवढंच मी जाणतो. निसर्गाच्या रचनेबद्दल कन्स्ट्रक्टल लॉ नावाचा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. हा सिद्धांत हे सिद्ध करायचा प्रयत्न करतो की, ज्या प्रकारे एका अणूची निर्मिती झाली आहे, अगदी त्याच प्रकारे या ब्रह्मांडाचीही निर्मिती झालेली आहे. ज्याप्रकारे एका पेशीची रचना केली गेली आहे, अगदी त्याच प्रकारे प्रत्येक जीव निर्मिलेला आहे. एक अमिबा ज्या प्रकारे घडवला गेला आहे, त्याच प्रकारे एक मनुष्यसुद्धा घडवला गेला आहे. फक्त त्या त्या निर्मितीमधील गुंतागुंत आणि क्लिष्टता कमी-जास्त असेल एवढंच. निसर्गाचा हा आविष्कार एका मोठ्या चमत्काराप्रमाणेच आहे. ते पाहून मनुष्य अचंबित होतो.
योग विज्ञानात याबद्दल आम्ही नेहमीच बोलत आलेलो आहोत अंड आणि पिंड दोन्ही एकच आहेत. सृष्टीच्या मूलभूत रचनेच्या स्वरूपात, सर्वात सूक्ष्म रचना आणि सर्वात विशाल रचना दोन्ही एकसमान आहेत. फक्त त्यामधील गुंतागुंत आणि क्लिष्टता कमीअधिक आहे एवढंच.
म्हणून, माझं जीवन म्हणून जे आहे, ते पूर्णत: मी जाणलेलं आहे. सुदैवाने तुम्हीसुद्धा माझ्यासारखंच एक जीवन आहात, म्हणून मी जर माझ्याबद्दल बोलत असलो, तर तुम्हाला असं वाटतं की, मी तुमच्याबद्दल बोलतो आहे. मी माझ्याबद्दल बोलत असलो, तर तुम्हाला असं वाटतं की, मी ब्रह्मांडाबद्दल बोलतो आहे. मी जर माझ्याबद्दल बोलत असलो, तर काही लोकांना असं वाटतं की, मी ईश्वराबद्दल बोलतो आहे. हे सर्व त्यांच्या त्यांच्या मनाचे अन्वयार्थ आहेत. पण मी फक्त केवळ माझ्याबद्दल बोलतो आहे.

Web Title: The experience of God

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.