सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 6

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:29 PM2017-07-24T12:29:23+5:302017-07-25T16:33:03+5:30

बारकाईने पाहिले तर पर्यावरणातला प्रत्येक घटक इतका महत्वाचा आहे की एकावर दुसरे दुस-यावर तिसरे घटक अवलंबून आहेत हे तुमच्या लक्षांत येईल.

Easy to sorrow is difficult to sorrow - Part 6 | सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 6

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 6

Next

- सदगुरू श्री वामनराव पै
आपण एकमेकांच्या सुखाला किंवा दु:खाला कारणीभूत आहोत
बारकाईने पाहिले तर पर्यावरणातला प्रत्येक घटक इतका महत्वाचा आहे की एकावर दुसरे दुस-यावर तिसरे घटक अवलंबून आहेत हे तुमच्या लक्षांत येईल. या दृष्टीकोनातून जो जीवन जगतो त्याच्या जीवनातले दु:ख हरण होते आणि तो माणूस सुखी होेतो.आज आपण एकमेकांवर अवलंबून आहोत.आपण एकमेकांच्या सुखाला किंवा दु:खाला कारणीभूत आहोत ही गोष्ट लोकांच्या ध्यानातच येत नाही.लोकांना आपल्या वाटयाला दु:ख आले की असे वाटते हा देवाचा कोप झाला,मूळ पुरुषाचा रोष झाला,आपण नवस फेडला नाही,दरवर्षी तीर्थयात्रा करतो ती केली नाही,अशा नाना  त-येच्या च्या समजूती लोकांच्या मनात असतात.पण हयाला काहीच अर्थ नाही.काही बुवाबाबा असे सांगतात की आमच्या मठाला दर महिन्याला भेट दिली नाही तर तुमच्यावर संकटे येतील.अशी ते लोकांच्या मनात भिती घालतात.आता हा बुवा रहातो एका टोकाला व लोक रहातात वेगवेगळ्या ठिकाणी.आजकाल प्रवासाचा खर्च इतका वाढलेला आहे की लोकांना तिथे जाणे खरंतर परवडत नाही परंतू संकट येईल हया भितीने ते दूरवरचा प्रवास करतात.हया बुवाबाबाने अशी भिती घातलेली असते की जणू काही या लोकांची सर्व जबाबदारी त्याच्या एकट्यावर आहे.जर कोणी तुमची अशी जबाबदारी घेतो असे म्हणत असेल तर ते खोटे आहे.खरंतर या सगळ्याचे भांडवल मनातील भिती आहे.मग तो माणूस गुंड असो पुंड असो त्या सर्वांचे भांडवल भिती आहे.काही डॉक्टर असे असतात की ते लोकांना घाबरवतात.अहो तुम्ही आलात म्हणून बरे झाले नाहीतर तुमचे काही खरे नव्हते. असे म्हटले की लोक घाबरतात आणि तो मागेल ती फी दयायला तयार होतात.मला असे काही बुवाबाबा माहित आहेत की ते सांगतात, “तुझ्या घरात तीन मृत्यू आहेत त्यात तुझा नंबर तिसरा आहे.”असे सांगितल्यावर कोण घाबरणार नाही सांगा बघू.मृत्यू ही संकल्पनाच लोकांना ठाऊक नाही.एका वर्षात तीन मृत्यू आहेत असे म्हटले की माणूस घाबरतोच.भिती घातली की या बुवाबाबांचे काम झाले.मग ते सांगतील तेवढे पैसे माणूस त्यांना देतो.कधीकधी घरात दु:ख आहे याचे कारण नवस फेडला नाही असे कुणीतरी पुजारी सांगतो व लोकांच्या मनात भिती घालतो.आता मला सांगा नवसाचा व तुमच्या दु:खाचा काही संबंध आहे का? तुम्ही नवस कुणाला केला देवाला.देव तुम्ही नवस फेडला की नाही हे पहात टपून बसला आहे का.अहो देवाचे साम्राज्य किती मोठे आहे.त्याला आपण अनंतकोटी ब्रम्हांड नायक म्हणतो.परमेश्वर हा अनंतकोटी ब्रम्हांड नायक आहे.त्या अनंत कोटी ब्रम्हांडांत माणूस हया प्राण्याला काही स्थान आहे का? जिथे पृथ्वीचे स्थान सुध्दा एका टिंबाइतके आहे तिथे माणसाला किती स्थान असेल.एक ब्रम्हांड,दोन ब्रम्हांड,एक सूर्य,दोन सूर्य नव्हे तर अनेक सूर्य आहेत असे आपले शास्त्रज्ञ सांगतात.

Web Title: Easy to sorrow is difficult to sorrow - Part 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.