Laxmi Pujan 2018: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सात वर्षांनी जुळून आलाय हा 'शुभ' योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 12:43 PM2018-11-03T12:43:02+5:302018-11-03T12:43:07+5:30

रोषणाईचा उत्सव म्हणून साजरा केला जाणारा दिवाळी सण आता काही दिवसांवरच आला आहे.

Diwali Laxmi Pujan 2018 Subh Muhurta Date Time And MahaYog Must Check | Laxmi Pujan 2018: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सात वर्षांनी जुळून आलाय हा 'शुभ' योग!

Laxmi Pujan 2018: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सात वर्षांनी जुळून आलाय हा 'शुभ' योग!

googlenewsNext

रोषणाईचा उत्सव म्हणून साजरा केला जाणारा दिवाळी सण आता काही दिवसांवरच आला आहे. यंदा ७ नोव्हेंबरला कार्तिक कृष्ण अमावस्येला दिवाळी उत्सव साजरा केला जाणार आहे. तज्ज्ञांनुसार यावेळी दिवाळीवर ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे ७ वर्षांनंतर एक खास योग जुळून आला आहे. असे मानले जात आहे की, हा योग सर्वांसाठी सुख-समृद्धी घेऊन येणारा ठरणार आहे. 

तज्ज्ञांनुसार, यावेळी ७ वी राशी तूळ ७ वर्षांनी सूर्य, शुक्र आणि चंद्र या तीन ग्रहांसोबत एकत्र येणार आहे. योगायोगाची बाब म्हणजे दिवाळी सुद्धा ७ तारखेला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे हा दिवसा ७ तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी फार शुभ मानला जात आहे. 

दिवाळी शुभ मुहूर्त

७ तारखेला लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांपासून ते ८ वाजून २० मिनिटांपर्यंत असणार आहे. तर व्यापाऱ्यांसाठी पूजेचा मुहूर्त सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांपासून ते ७ वाजून ५० मिनिटांपर्यत असणार आहे. 

धनत्रयोदशी शुभ मुहूर्त

५ नोव्हेंबर २०१८ ला धनत्रयोदशी साजरी केली जाणार. या दिवशी पूजेसाठी सायंकाळी ६.०५ वाजेपासून ते ८.०१ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त असेल. शुभ मुहूर्ताचा कालावधी १ तास ५५ मिनिटांचा असेल. तर या दिवशी खरेदी करण्याचा मुहूर्त सकाळी ७ वाजेपासून ते ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत, दुपारी १ वाजेपासून ते २ वाजून ३० मिनिटांपर्यंत तर सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून ते ७ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.
 

Web Title: Diwali Laxmi Pujan 2018 Subh Muhurta Date Time And MahaYog Must Check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.