सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 08:46 PM2017-08-04T20:46:32+5:302017-08-04T20:46:41+5:30

मानव जातीचे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण कितीही  म्हटले लोक सुखी व्हावेत तरी ते सुखी होणे शक्य नाही.यासाठी काय केले पाहिजे? यासाठी आपण आपल्या ठिकाणी असलेले अज्ञान दूर केले पाहिजे.

Difficult to grieve easier to sorrow - Part 20 | सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २०

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २०

Next

- सदगुरू श्री|वामनराव पै

सुखाचा प्रवास.

मानव जातीचे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण कितीही  म्हटले लोक सुखी व्हावेत तरी ते सुखी होणे शक्य नाही.यासाठी काय केले पाहिजे? यासाठी आपण आपल्या ठिकाणी असलेले अज्ञान दूर केले पाहिजे.जगाचे अज्ञान कोण दूर करणार? जगाचे अज्ञान दूर करणे हे काही आपल्या हातात नाही पण आपले अज्ञान दूर करणे हे आपल्या हातात आहे.आपले अज्ञान तरी आपण दूर करू शकतो.आपले अज्ञान दूर कधी होईल? जेव्हा आपण कुणाकडून तरी ज्ञान घेणार तेव्हा आपले अज्ञान दूर होईल.आम्ही कुणाकडूनच ज्ञान घेणार नाही असे म्हटले तर हा कायमचे अज्ञानीच रहाणार.काही लोक म्हणतात आम्ही व देव यांच्यामध्ये आम्हाला कुणी दलाल नको.थोडक्यात सदगुरुंना ते दलाल म्हणतात.आमचा थेट संबंध देवाकडे असे म्हणतात पण असे होवू शकते का? तर असे होवू शकत नाही.कारण साधे मंत्रालयातील ऑफिसरकडे जायचे तर तिथे दारावर शिपाई असतो.त्याने तुम्हांला आत सोडले तर तुम्ही आत जाऊ शकता.इथे हे असे आहे तर परमेश्वराच्या दरबारात, परमेश्वराच्या प्रांतात थेट प्रवेश कसा होवू शकेल.तिथे कुणी मार्गदर्शक नको का? प्रवासात मार्गदर्शक खूप महत्वाचा असतो.आपण प्रवासाला निघतो तेव्हा पहिले रिझर्वेशन करतो.जे शहाणे असतात ते प्रवासाला निघताना पहिले रिझर्वेशन करतात.रिझर्वेशन शिवाय प्रवास करणे म्हणजे मूर्खपणाचा कळस होय.प्रवासाला निघताना आपण त्या व्यक्तीला सांगतो. पहिले रिझर्वेशन कर,गाडी कुठली हे नीट समजावून घे,ते सुध्दा योग्य माणसाकडून समजावून घेत आहेस हयाची खात्री करून घे,नाहीतर सांगणारा चुकीचे सांगत असेल तर प्रवास चुकीचा होईल.योग्य माणसाकडून गाडी कुठली, प्लॅटफॉर्म कुठला, डबा कुठला हे समजावून घे मग काहीच त्रास नाही, कटकट नाही, प्रवास अगदी आनंदाचा होईल.अगदी झोपायला नाही मिळाले तरी बसून डुलकी तर घेवू शकशील.याउलट गाडी चुकली, डबा चुकला,प्लॅटफॉर्म चुकला, वेळ चुकली तर काही लोक वेळेत जात नाहीत गाडी आठला सुटणार असेल तर हे शेवटपर्यंत गाडीपर्यंत पोहचतच नाहीत आणि मग धावपळ करून गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात त्यात कधी सामान पडते तर कधी हेच पडतात कधी पायच गाडीखाली जातो.आता हे सर्व व्याप करण्यापेक्षा अर्धातास अगोदर जाऊन बसा ना.घरी बसणार ते तिथे जावून बसा.काही लोक म्हणतात अगोदर कशाला जाऊन बसायचे.घरी बसून तरी काय करणार त्यापेक्षा तिथे अर्धा तास अगोदर जाऊन बस.मी कुठेही जायचे असेल तर अर्धा तास आधी स्टेशनवर जातो.घाई घाईने प्रवास करायचाच नाही.याला म्हणतात सुखाचा प्रवास.

Web Title: Difficult to grieve easier to sorrow - Part 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.