‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 03:39 AM2018-09-04T03:39:00+5:302018-09-04T03:39:16+5:30

काला संस्कृत तत्त्वज्ञानामध्ये एक फार महत्त्वपूर्ण म्हण आहे की, ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। म्हणेजच शुभ गोष्टींचा साक्षात्कार अनेक प्रकारच्या विचारधारांनी होत असतो. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म झालेला आहे.

The birth of diversity in Indian culture | ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म

‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म

Next

- डॉ. भूषण कुमार उपाध्याय

काला संस्कृत तत्त्वज्ञानामध्ये एक फार महत्त्वपूर्ण म्हण आहे की, ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। म्हणेजच शुभ गोष्टींचा साक्षात्कार अनेक प्रकारच्या विचारधारांनी होत असतो. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म झालेला आहे. अनेक प्रकारच्या विचारधारांच्या अस्तित्वामुळे भारतीय संस्कृती संपन्न आणि दृढ बनविलेली आहे. पुढील विधान हे याच गोष्टीचे सूचक आहे-
‘एकं सद्म विप्रा बहुधा वदन्ति’।
म्हणजे एकाच शुभ गोष्टीस विद्वान मनुष्य निरनिराळ्या प्रकाराने सादर करीत असतो. भारतीय कायदेपंडितांच्या म्हणण्यानुसार, मूळ ऊर्जा ही एकच आहे. परंतु जेव्हा ती व्यक्त होते, तेव्हा ती निरनिराळे रूप धारण करीत असते. तसेच ती एक असूनसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात प्रदर्शित होत असते. एकच ऊर्जा व्यक्त होऊन अनेक नावे आणि रूपे धारण करीत असते. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये एकाच तथ्य/खऱ्या गोष्टीला पाहण्याचे विविध दृष्टीकोन निर्माण झालेले आहेत. लोकशाहीचीसुद्धा हीच विशेषता आहे की, येथे अनेक प्रकारच्या विचारांचा आदर केला जातो. लोकशाही ही अशा प्रकारची बाग आहे ज्यामध्ये अनेक प्रकारची फुले उमलली आहेत. तसेच लोकशाहीच्या बागेमध्ये जितकी विविधता राहील ती तितकीच सुंदर दिसेल. भारतीय संस्कृतीमध्ये ईश्वरप्राप्तीकरितासुद्धा विविध मार्ग सांगितले गेलेले आहेत. ज्यामध्ये ज्ञान, भक्ती आणि कर्म हे मुख्य आहेत. प्राचीन काळात ज्ञान, भक्ती आणि कर्म यांना ईश्वरप्राप्तीचे वेगवेगळे मार्ग मानले जात होते. सदर मार्गांना माननारे स्वत:ला अन्य मार्गांच्या तुलनेत श्रेष्ठ असे मानत होते. तसेच या मार्गाला मानणाºया व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष आणि विरोध पाहायला मिळत होता. परंतु श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सुंदर प्रकारे या तीनही मार्गांचा समन्वय केलेला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कथनानंतर या मार्गांमध्ये जी पारंपरिक कटुता आणि वैमनस्य होते ते आता समाप्त झालेले असून एक प्रकारचे समन्वयक वातावरण निर्माण झालेले आहे. याच तºहेने भक्ती मार्गाचा अवलंब करणारे संत तुलसीदास यांनीसुद्धा ‘राम-चरित मानस’ ग्रंथामध्ये एक प्रकारे समन्वयक दृष्टीकोन स्वीकारलेला आहे. हा समन्वयवादी दृष्टीकोन समाज टिकण्याकरिता अतिआवश्यक आहे.

Web Title: The birth of diversity in Indian culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.