संतांची संगती हा भगवंत प्राप्तीचा चांगला मार्ग 

By appasaheb.patil | Published: February 16, 2019 07:07 PM2019-02-16T19:07:02+5:302019-02-16T19:08:37+5:30

सोलापूर :  माझ्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये ही मूळ भावना संत साहित्यात दिसून येते. संतांची संगती हा भगवंत प्राप्तीचा ...

The association of saints is a good way of earning God's blessings | संतांची संगती हा भगवंत प्राप्तीचा चांगला मार्ग 

संतांची संगती हा भगवंत प्राप्तीचा चांगला मार्ग 

Next
ठळक मुद्देभगवान वेदव्यासांइतके मानवी कल्याणासाठी मोठे कार्य इतर कोणीही केले नाहीज्ञान जगाच्या मांगल्याकरिता उपयोगात आणले तरच ते खरे ज्ञान असते

सोलापूर :  माझ्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये ही मूळ भावना संत साहित्यात दिसून येते. संतांची संगती हा भगवंत प्राप्तीचा चांगला मार्ग आहे. यावेळी भगवान वेदव्यास आणि महर्षी नारद यांचा संवाद सांगताना भगवंताच्या दर्शनाची ओढ लागली कि भक्तीचे बीज रुजले असे समजावे असे आचार्य किशोरजी व्यास म्हणाले.

संत साहित्य हे सर्वश्रेष्ठ साहित्य आहे. महाभारतासारखा अजोड ग्रंथ भगवान वेदव्यास यांनी लिहिला. महर्षी व्यास हे जगातील साहित्यिकांचे मेरूमणी आहेत असे प्रतिपादन आचार्य किशोरजी व्यास यांनी केले.

श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीतर्फे प. पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज उपाख्य आचार्य किशोरजी व्यास यांच्या भागवत कथेचे आयोजन पर्ल गार्डन येथे करण्यात आले आहे. यात मंगळवारी त्यांनी श्रीमद भागवत महात्म्य, कथारंभ मुनीजिज्ञासा, श्री नारद व्यास संवाद आणि सद्यस्थिती विस्ताराने सांगितली.

आचार्य किशोरजी व्यास म्हणाले, कलियुगातही वेदांचे रक्षण व्हावे असे विचार महर्षी वेदव्यास यांनी केला. कलियुगात धारणाशक्ती कमी होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी मार्गदर्शन केले. प्रगतीच्या गप्पा आपण मारतो. परंतु समाजाची अधोगतीच अधिक होत आहे. खाण्यापेक्षा औषधांचा खर्च अधिक होण्याला आपण प्रगती संबोधत आहोत.

भगवान वेदव्यासांइतके मानवी कल्याणासाठी मोठे कार्य इतर कोणीही केले नाही. त्यांनी जगाला खरे ज्ञान दिले. सध्या किडनी स्कॅडल चालविणाºयांना ही ज्ञान असतेच. परंतु ज्ञान जगाच्या मांगल्याकरिता उपयोगात आणले तरच ते खरे ज्ञान असते. संत साहित्याने जगाला खरे ज्ञान दिले़

Web Title: The association of saints is a good way of earning God's blessings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.