अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 02:07 AM2019-02-14T02:07:42+5:302019-02-14T02:07:54+5:30

भगवद्गीतेतला ८ व्या अध्यायातला २४वा श्लोक आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अग्नी, ज्योती म्हणजे ज्वाळा, दिवस, शुक्लपक्ष, उत्तरायणाचे ६ महिने, यात मेलेले ब्रह्मवेत्ते लोक मेल्यावर ब्रह्मास पोचतात.

AgniGarotirah: Shukla: Shashmasa Uttarayanayam | अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्

अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्

googlenewsNext

- शैलजा शेवडे

अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्।
तत्र प्रयाता गच्छिन्त ब्रह्म ब्रह्मविदो जना:।।
भगवद्गीतेतला ८ व्या अध्यायातला २४वा श्लोक आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अग्नी, ज्योती म्हणजे ज्वाळा, दिवस, शुक्लपक्ष, उत्तरायणाचे ६ महिने, यात मेलेले ब्रह्मवेत्ते लोक मेल्यावर ब्रह्मास पोचतात. इच्छामरणी भीष्माचार्यांनी शरपंजरी पडलेले असतांनाही उत्तरायणाची वाट का पहावी. मला खरोखरच प्रश्न पडला होता. उत्तरायणात मृत्यू पावल्याने काय होते, तर मोक्ष मिळतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. कसला अग्नी, कसली ज्योत. काही कळत नव्हते. पण माझ्या मदतीस ज्ञानेश्वरी आली. त्यात लिहिले आहे, भगवद्रूप होणे आणि जन्ममरणाच्या फेºयात सापडणे, ही दोन्ही ठराविक मरणवेळेच्या आधीन आहेत. मृत्यू समय आल्यावर शेवटी पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघतात. ब्रह्मिस्थतीला प्राप्त केले असता मरणकाळ प्राप्त झाला असतांना बुद्धीला भ्रम गिळत नाही. स्मरणशक्ती आंधळी होत नाही. आणखी मन मारत नाही. याप्रमाणे हा सर्व इंद्रियसमुदाय मरणसमयी टवटवीत असतो. हा त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणे हे केवळ अग्नीचे सहाय्य असेल, तर घडेल. वाºयाने, किंवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो, तेव्हा शाबूत असलेली आपली दृष्टी कशी पाहू शकेल. देह पडण्याच्या वेळी त्रिदोषाने देह आतबाहेर कफाने व्यापला जातो, अग्नीचे तेज निघून जाते. त्यावेळी प्राणास क्रियाशक्ती नसते. अर्चिरादि किंवा ज्योतिरादि मार्ग हा आरंभापासून अखेरपर्यंत उजेडाचा आहे. ज्ञान हे प्रकाशमय व परब्रह्म हे ज्योतिषां ज्योति: म्हणजेच तेजाचे तेज असल्यामुळे देहपातानंतर ज्ञानी पुरुषांचा मार्ग प्रकाशमय असणारच....!

Web Title: AgniGarotirah: Shukla: Shashmasa Uttarayanayam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.