आश्वासनांची आतषबाजी करून ठाकरे सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली; भाजपचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 12:42 PM2021-10-24T12:42:35+5:302021-10-24T12:43:15+5:30

मातोश्री व वर्षावर दिवाळीनिमित्त रोषणाई करू नका : आ प्रशांत परिचारक

Thackeray government cheated farmers by setting fire to promises; BJP's allegation | आश्वासनांची आतषबाजी करून ठाकरे सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली; भाजपचा आरोप

आश्वासनांची आतषबाजी करून ठाकरे सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली; भाजपचा आरोप

Next

पंढरपूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात क्विंटलला ११ हजारापर्यंत मिळणारा भाव आता चार ते पाच हजारांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्याने माल बाजारात आणणे थांबविल्याने आवकही थंडावली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. यामुळे ठाकरे सरकारला जरादेखील लाज असेल, तर यंदाची दिवाळी शेतकऱ्याच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे जाहीर करावे असे आवाहन आ. प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.

ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेची व शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी,


पंढरपूर येथे राष्ट्रिय महामर्गाच्या रस्त्यांच्या कामाच्या भूमिपूजनासाठी राष्ट्रिय महामार्ग मंत्री नितीन गडकरी येणार आहेत. या विषयी माहिती देण्यासाठी भाजपचे आ. प्रशांत परिचारक यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या प्रसंगी त्यांनी महविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते.

पुढे परिचारक म्हणाले, राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनींवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत, आणि पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. जमिनीचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नाही, आणि ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्याची थट्टा करत आहे. जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडीदेखील शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झाला आहे. यातून आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने ठाकरे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे. या दुःखामुळे हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार असून, मातोश्री वर्षा आणि मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार आहे. ठाकरे सरकारला जरादेखील लाज असेल, तर यंदाची दिवाळी शेतकऱ्याच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे असे ते म्हणाले.

गेल्या महिनाअखेरीपर्यंत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या २८ लाख पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. त्यामध्ये आता आणखी काही लाख सूचनांची भर पडली आहे. शेतकऱ्यास वाऱ्यावर सोडणार नाही, असे पोकळ आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांना दिलेल्या ९७३ कोटींच्या रक्कमेपैकी शेतकऱ्याच्या हातात फुटकी कवडीदेखील पडलेली नाही. याची सरकारला शरम वाटत नाही का, असा सवालही त्यांनी केला. सरकारी अधिकारी व दलालांनी संगनमत करून राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक
चालविली आहे. 

अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले असताना या पिकाच्या मोठ्या उत्पन्नाचे आमीष दाखवून प्रमाणावर शेतकऱ्याची दिशाभूल केली. भेसळयुक्त खते, निकृष्ट बियाणे आणि फसवणुकीमुळे शेतकरी अगोदरच नागविला गेला असताना, अतिवृष्टीमुळे हातचे पीक वाया गेल्यावर मात्र ठाकरे सरकार मूग गिळून गप्प आहे, असा आरोप आ. परिचारक यांनी केला.

पुढे भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले, कोकण आणि विदर्भातील धानाच्या पिकाचीही प्रचंड हानी झाली आहे. ऊसाबाबत सरकारचे धोरण कारखानदारांच्या धार्जिणे असल्याने ऊस उत्पादकांनाही सरकारने वाऱ्यावर
सोडले आहे. चहूबाजूंना कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यासाठी सरकारच्या संवेदना मात्र संपल्या आहेत, संकटांनी वेढलेल्या सामान्य जनतेसाठी काहीह न करता केवळ सरकार स्थिर असल्याची निरर्थक व जनतेशी देणेघेणे नसलेले राजकारण करण्यात सरकारचे मंत्री गर्क आहेत. अमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईच्या विरोधात मोहीम उघडणाऱ्या सरकारला शेतकऱ्याची दुःखे जाणून घेण्यात रस नसल्याने जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला आहे,
अशी टीका श्रीकांत देशमुख यांनी केली.


३० ऑक्टोंबरला नितीन गडकरी पंढरपुरात....

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संत मंडळींच्या हस्ते होणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार तीन जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहे.

Web Title: Thackeray government cheated farmers by setting fire to promises; BJP's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.