पोलिस भरतीसाठी चक्क बनावट दाखले, बीड, लातूर जिल्ह्यांतील दोघांवर गुन्हे दाखल; सिंधुदुर्गातील घटनेने खळबळ

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 31, 2023 06:15 PM2023-05-31T18:15:24+5:302023-05-31T18:39:16+5:30

आरोपींच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची पथके रवाना

two candidates gave bogus certificate In Sindhudurg police recruitment | पोलिस भरतीसाठी चक्क बनावट दाखले, बीड, लातूर जिल्ह्यांतील दोघांवर गुन्हे दाखल; सिंधुदुर्गातील घटनेने खळबळ

संग्रहित छाया

googlenewsNext

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्या मे २०२३ मध्ये झालेल्या भरतीत चक्क बोगस प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशानुसार लातूर आणि बीड जिल्ह्यांतील दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर भाऊसाहेब सातपुते ( रा. जाम्ब शिरूर कासार, जिल्हा बीड ) आणि कृष्णा राजेंद्र राचमले ( रा. मावलगाव, अहमदपूर, जिल्हा लातूर ) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

सिंधुदुर्ग पोलिस भरतीसाठी भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त असल्याचा बोगस दाखला जोडला होता. हे दोघे उमेदवार पोलिस भरतीसाठी पात्र ठरले होते. पात्र उमेदवारांच्या सर्व शैक्षणिक आणि अन्य आरक्षणनिहाय दाखल्याची पडताळणी करण्यात येते. या दोन्ही उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे पडताळणीत सिद्ध झाले आहे. 

त्यामुळे ज्ञानेश्वर सातपुते आणि कृष्णा राचमले यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्यांवर फसवणुकीसह अन्य कलामांद्वारे सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Web Title: two candidates gave bogus certificate In Sindhudurg police recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.