सातारा: वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरू, जलाशयाच्या काठावरील नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 11:18 AM2022-08-10T11:18:35+5:302022-08-10T17:57:15+5:30

मराठवाडी धरणाच्या जलाशयाच्या काठावरील उमरकांचन, मेंढ येथील अनेक धरणग्रस्त कुटुंबांनी सध्या निवारा शेडमध्ये आश्रय घेतला आहे. उमरकांचन गावात सध्या पाणी आले आहे.

Heavy rain in Patan taluka of Satara district, Discharge of water from the spillway of Wang Marathwadi dam has started | सातारा: वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरू, जलाशयाच्या काठावरील नागरिकांचे स्थलांतर

सातारा: वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरू, जलाशयाच्या काठावरील नागरिकांचे स्थलांतर

googlenewsNext

प्रमोद सुकरे

कराड : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. कोयना धरणातीलपाणीसाठा झपाट्याने वाढत असतानाच ढेबेवाडी खोऱ्यात असलेले वांग मराठवाडी धरण ७० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे.

या विभागातील लोकांना फायदेशीर ठरणारे हे धरणाचे तब्बल २५ वर्षानंतर बांधकाम होऊन पूर्ण झाले. या धरणाचे चारही वक्र दरवाजे सध्या खुलेच ठेवण्यात आले आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास वांगनदी धोक्याच्या पातळीवर वाहण्याची शक्यता आहे.

या  नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडी धरणाच्या जलाशयाच्या काठावरील उमरकांचन, मेंढ येथील अनेक धरणग्रस्त कुटुंबांनी सध्या निवारा शेडमध्ये आश्रय घेतला आहे. उमरकांचन गावात सध्या पाणी घुसू लागले आहे. गावातील अनेक कुटूंबे निवारा शेडमध्ये राहण्यास गेली आहेत.

Web Title: Heavy rain in Patan taluka of Satara district, Discharge of water from the spillway of Wang Marathwadi dam has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.