सिद्धेवाडीत धाडसी दराेडा; दीड लाखाचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:29 AM2021-09-27T04:29:27+5:302021-09-27T04:29:27+5:30

सिद्धेवाडी येथील खरात वस्ती परिसरात रावसाहेब रामू खरात यांच्या घरावर रात्रीच्या सुमारास सहा ते सात दरोडेखोरांनी दरवाजावर दगड मारून ...

Brave Darada in Siddhewadi; One and a half lakh was looted | सिद्धेवाडीत धाडसी दराेडा; दीड लाखाचा ऐवज लुटला

सिद्धेवाडीत धाडसी दराेडा; दीड लाखाचा ऐवज लुटला

Next

सिद्धेवाडी येथील खरात वस्ती परिसरात रावसाहेब रामू खरात यांच्या घरावर रात्रीच्या सुमारास सहा ते सात दरोडेखोरांनी दरवाजावर दगड मारून दहशत निर्माण केली. यावेळी वस्तीवरील नागरिकांनी आरडाओरडा केल्याने दरोडेखोरांनी पळ काढला. त्यानंतर खोत मळा येथे बाबाजी धोंडी खोत यांच्या घरावर दरोडा टाकला. बाबाजी खाेत यांना मारहाण करून त्यांच्या पत्नीचे तीन तोळे साेन्याचे दागिने व १४ हजार रुपये रोख रक्कम लंपास केले. तसेच त्यांचे दोन मोबाइल फोडले. दहशत माजवीत घरावर काठ्या कुऱ्हाडीसह दगडाने हल्ला करून नुकसान केले. दरोडेखोरांच्या दहशतीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. दराेडेखाेरांनी केलेल्या मारहाणीत बाबाजी खोत जखमी झाले आहेत. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Brave Darada in Siddhewadi; One and a half lakh was looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.