सांगली जिल्ह्यातील ३८ सरपंच, ५७० सदस्य बिनविरोध; निवडणूक रिंगणात किती उमेदवार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 02:23 PM2022-12-09T14:23:45+5:302022-12-09T14:40:43+5:30

बिनविरोध निवड झालेले उमेदवार तालुकावार जाणून घ्या

38 Sarpanchs, 570 members unopposed in Sangli district | सांगली जिल्ह्यातील ३८ सरपंच, ५७० सदस्य बिनविरोध; निवडणूक रिंगणात किती उमेदवार? जाणून घ्या

सांगली जिल्ह्यातील ३८ सरपंच, ५७० सदस्य बिनविरोध; निवडणूक रिंगणात किती उमेदवार? जाणून घ्या

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील ४१७ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी एक हजार १२० उमेदवार आणि चार हजार २६९ सदस्यपदासाठी आठ हजार ६०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सरपंचपदासह सहा हजार ७३५ उमेदवारांनी निवडणुकीतून आपले अर्ज बुधवारी मागे घेतले आहेत. यामुळे ३८ सरपंच आणि ५७० सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत.

जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींपैकी २८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तसेच कडेगाव तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. यामुळे सध्या ४१७ ग्रामपंचायतींसाठीच निवडणूक होत आहे. सरपंचपदासाठी दोन हजार ४६६ अर्ज दाखल झाले होते.

यापैकी एक हजार २९२ उमेदवारांनी एक हजार ३०२ अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे सरपंचपदासाठी एक हजार १२९ उमेदवारांचे एक हजार १४८ अर्ज शिल्लक राहिले आहेत. ४१७ ग्रामपंचायतीच्या एक हजार ५८८ प्रभागातील चार हजार २६९ जागांसाठी आठ हजार ७३० उमेदवारांचे आठ हजार ६०४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

बिनविरोध निवड झालेले उमेदवार

तालुका सरपंच सदस्य
मिरज १ ४८
तासगाव ४६
क.महांकाळ ३४
जत ३०
खानापूर १०९
आटपाडी 
पलूस ११
कडेगाव २ ३८
वाळवा १११
शिराळा १२८
एकूण ३८५७०

निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या

तालुका ग्रामपंचायतसरपंच सदस्य
मिरज ३५१०१९२२
तासगाव २४६५४५४
क.महांकाळ २८७९ ५८६
जत७९१९७ १५०८
खानापूर ३७९३ ५५३
आटपाडी २५६४ ४९५
पलूस १३ ३८ ३६२
कडेगाव ३९११२ ७५०
वाळवा ८१२०४ १७३४
शिराळा ५६१२८ ६७०
एकूण ४१७१०८२ ८०३४

 

Web Title: 38 Sarpanchs, 570 members unopposed in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.