रत्नागिरी जिल्ह्याला गुवाहाटी दौऱ्याचे फलित लवकरच मिळेल : उदय सामंत

By संदीप बांद्रे | Published: December 2, 2022 07:22 PM2022-12-02T19:22:51+5:302022-12-02T19:29:31+5:30

जिल्ह्याबाहेरील लोकांकडून माथी भडकवण्याचे काम

The district will soon get the results of the Guwahati tour says Industries Minister Uday Samant | रत्नागिरी जिल्ह्याला गुवाहाटी दौऱ्याचे फलित लवकरच मिळेल : उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्याला गुवाहाटी दौऱ्याचे फलित लवकरच मिळेल : उदय सामंत

googlenewsNext

चिपळूण : जिल्ह्याला साडेसात वर्षानंतर विद्यमान सरकारमुळे स्थानिक पालकमंत्री मिळाला. पालकमंत्री या नात्याने एका दिवसात ३०० कोटीची कामे मंजूर करू शकलाे. मुख्यमंत्री आल्यास ते ३ हजार कोटीचा निधी देतील. हे गुवाहाटी दौऱ्याचे फलित असून, त्याचे फळ लवकरच जिल्ह्याला मिळेल, असा विश्वास पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे व्यक्त केला.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शहरातील विविध विकासकामांची भूमिपूजन व उद्घाटने शुक्रवारी पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यावेळी पालकमंत्री सामंत यांनी विविध विकास कामांसाठी सुमारे २०० कोटी निधीची घोषणा केली. चिपळुणात पूरपरिस्थिती न येण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लाल व निळ्या पूररेषेबाबत लवकरच मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल.

नगर परिषदच्या बहाद्दूरशेख नाका येथील औद्योगिक वसाहतीत बचत गटाच्या इमारतीसाठी १ कोटी रुपये, गोवळकोट किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची जागा संपादीत करण्यासाठी आवश्यक निधी, शहरातील रस्त्यासाठी नगरोत्थानमधून साडेचार कोटीचा निधी मंजूर केल्याचे सांगितले.

तसेच शिंदे - फडणवीस सरकारच्या माध्यमातून चिपळूण शहराचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न केला जाईल. चिपळूणवर पुराचे पुन्हा गंभीर संकट येऊ नये, यासाठी सत्ताधारी राज्यसरकार कटीबद्ध असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याबाहेरील लोकांकडून माथी भडकवण्याचे काम

नाणार प्रकल्पाविषयी सुरुवातीला आपली व इतरांचीही भूमिका विरोधी होती हे मान्य आहे, पण थेट कायम स्वरूपी ७ हजार नोकऱ्या देणाऱ्या या प्रकल्पाला आता विरोध करून चालणार नाही. जिल्ह्यातील तरूणांना नोकऱ्या हव्या असतील तर येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करून चालणार नाही. प्रकल्प येण्यासाठी आता समर्थन करणाऱ्या संघर्ष समित्या स्थापन व्हायला हव्यात. मात्र, दुर्दैवाने सध्या जिल्ह्याबाहेरील लोक स्थानिकांची माथी भडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. घरा-घरात भांडणे लावण्याचे प्रकार त्यांनी सुरू केलेत. जिल्ह्यात प्रकल्प आले तरच जिल्ह्याचा कायापालट होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Web Title: The district will soon get the results of the Guwahati tour says Industries Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.