शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूंच्या घटनांची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून होणार सखोल चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2023 05:18 AM2023-06-05T05:18:53+5:302023-06-05T05:19:47+5:30

जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे निर्देश

sub divisional magistrate to conduct thorough investigation into deaths during shivrajyabhishek ceremony | शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूंच्या घटनांची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून होणार सखोल चौकशी

शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूंच्या घटनांची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून होणार सखोल चौकशी

googlenewsNext

जमीर काझी, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग- रायगडावरीलशिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दरम्यान मृत्यू पावलेल्या दोन  शिवभक्तांच्या मृत्यूची सखोल चौकशी महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत केली जाणार आहे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश मस्के यांनी याबाबत रविवारी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

रायगड किल्ल्यावर तिथीनुसार २ जून  व तारखेनुसार ६ जून  रोजी किल्ले रायगडावर आयोजित केलेल्या ३४९ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान दि.२ जून  रोजी ओमकार दिपक भिसे,( वय १९ रा. संकेश्वर ता. हुकेरी जि. बेळगाव) यांचा व 4 जूनला प्रशांत गुंड, (२८ या. पुणे )यांचा मृत्यू झाला आहे.  या  घटनांची तीव्रता पाहता या घटनांची समितीमार्फत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,रायगड डॉ.योगेश म्हसे  यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा - 2005 अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार या घटनांची चौकशी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, महाड यांची एकसदस्यीय समिती गठीत केली आहे. 

उपविभागीय दंडाधिकारी यांनी नमूद दोन्ही घटनांची सखोल चौकशी करुन अहवाल त्यांच्या अभिप्रायासह तातडीने पंधरा दिवसांत  सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यानुसार महाड प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी  प्रतिमा पुदलवाड यांना घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सर्व स्तरावर सखोल चौकशी करणे. व शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने घेतलेल्या महाड बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांची सर्व संबंधित विभागांनी अंमलबजावणी केली अगर कसे? याबाबत चौकशी करणे. , सर्व संबंधितांचे म्हणणे दाखल करुन घेणे., सदर घटना या कोणत्याही व्यक्ती अथवा यंत्रणांच्या चुकी अथवा हलगर्जीपणामुळे घडल्या की हा अपघात होता, याबाबत निरीक्षण नोंदविणे , सदर घडलेल्या घटनेचा चौकशी अहवाल आपल्या स्पष्ट अभिप्रायासह सादर करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच या सोहळयाच्या नियोजनामध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही शासकीय विभागाच्या विभाग प्रमुखास चौकशी अधिकाऱ्यांनी साक्ष देण्यासाठी अथवा अहवाल सादर करण्यास बोलाविल्यास त्यांनी तात्काळ हजर राहणे अथवा अहवाल सादर करणे अनिवार्य असेल. असे करण्यास कुचराई केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा - २००५ मधील कलम ५१,५२ व ५५ कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही म्हसे यांनी सूचित केले आहे.

Web Title: sub divisional magistrate to conduct thorough investigation into deaths during shivrajyabhishek ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.