रायगड जिल्ह्यात जीवघेण्या व्हायरसची अफवा, परप्रांतीयांमधून संक्रमण होत असल्याची चर्चा, नागरिक भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 08:22 PM2021-09-23T20:22:30+5:302021-09-23T20:22:58+5:30

Raigad News: आक्षी-साखर गावामध्ये माणस मरत आहेत, अशी अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भातीचे वातावरण आहे.

Rumors of deadly virus in Akshi Village Raigad district, talk of infection from foreigners, citizens scared | रायगड जिल्ह्यात जीवघेण्या व्हायरसची अफवा, परप्रांतीयांमधून संक्रमण होत असल्याची चर्चा, नागरिक भयभीत

रायगड जिल्ह्यात जीवघेण्या व्हायरसची अफवा, परप्रांतीयांमधून संक्रमण होत असल्याची चर्चा, नागरिक भयभीत

Next

रायगड - अलिबाग तालुक्यात गॅस्ट्राेने दाेघांचा बळी घेतला तर अन्य १८ जण सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये परप्रांतीयांचा समावेश असल्याने यांनीच काेणता तरी वेगळा राेग आणल्याने आक्षी-साखर गावामध्ये माणस मरत आहेत, अशी अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भातीचे वातावरण आहे. (Rumors of deadly virus in Akshi Village Raigad district, talk of infection from foreigners, citizens scared)

आक्षी-साखर परिसरामध्ये मासेमारी व्यवसाय जाेरात चालताे. या ठिकाणी परप्रांतीय नागरिक माेठ्या संख्येने स्थानिकांच्या बाेटीवर कामाला आहेत. काेराेनाचे सावट, विविध नैसर्गिक वादळांचा फटका बसल्याने मासेमारी व्यवसाय डबघाईला आला आहे. पावसाळ्यात मासेमारी व्यवसाय बंद असताे. आता ताे बऱ्यापैकी सुरू झाला आहे. त्यामुळे परप्रांतात गेलेले मजूर पुन्हा परतले आहेत. १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत तब्बल २० रुग्ण गॅस्ट्राेच्या आजाराने त्रस्त झाले. त्यांच्यावर अलिबागच्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत असताना दाेघांचा मृत्यू झाला हाेता. या प्रकारानंतर २३ सप्टेंबर राेजी सकाळपासूनच आक्षी-साखरमध्ये काेणता तरी राेग आला असून त्यामुळे माणसे मरत आहेत, असल्याची अफवा पसरल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, तसेच परप्रांतातील मजुरांमध्ये या रोगाचे संक्रमण झाल्याच्या चर्चांना उधाण आले.

बाेटीवर काम करण्यासाठी दरवर्षी नवीन माणसे येत असतात. कधी-कधी त्यांना हवामान आणि बाेटीवरील वास्तव्य रुचत नाही. काही आपल्या गावी परत जातात. गावात कसलाच व्हायरस आलेला नाही. नागरिकांनी अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वासही ठेवू नका.
-कैलास चाैलकर, काेळी समाज, माजी अध्यक्ष

गावात कसलाही व्हायरस आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. गावात काहींना त्रास झाला. तशी घटना मुंबई येथील मडमध्येही घडली आहे.
-आनंद बुरांडे, उपसरपंच, आक्षी

गावात काेणताही नवीन रुग्ण सापडला नाही अथवा काेणाचा मृत्यूही झालेला नाही. व्हायरस पसरल्याची अफवा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या तब्येतीची काळजी घ्या.
- डाॅ. अभिजित घासे, आराेग्य अधिकारी, अलिबाग 

Web Title: Rumors of deadly virus in Akshi Village Raigad district, talk of infection from foreigners, citizens scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.