पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडीचे सहकार पॅनलचे वर्चस्व; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत

By वैभव गायकर | Published: November 28, 2022 07:47 PM2022-11-28T19:47:35+5:302022-11-28T19:48:02+5:30

 पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडीचे सहकार पॅनलचे वर्चस्व राहिले असून भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले. 

Panvel Urban Bank was dominated by Maha Vikas Aghadi cooperation panel and all BJP candidates were defeated | पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडीचे सहकार पॅनलचे वर्चस्व; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत

पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडीचे सहकार पॅनलचे वर्चस्व; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत

Next

पनवेल : द पनवेल कॉ- ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलने भाजप प्रणित उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव केला आहे.तेरा च्या तेरा जागेवर महाविकास आघाडीचे सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याने पनवेल मधील आगामी निवडणुकिंची चुरस यामुळे चांगलीच वाढणार आहे.

पनवेल अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण १३ जागेसाठी दि.13 रोजी पनवेलमधील व्ही.के.हायस्कुल मध्ये बॅलेट पेपरवर साधारण 68 टक्के मतदान झाले. सोमवार दि.28 रोजी मतमोजणीला सुरुवात झाली.यावेळी दोन्ही बाजूचे प्रमुख नेते,उमेदवारानी मतमोजणी केंद्रावर हजेरी लावली होती.सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार आघाडीवर होते.हि आघाडी शेवट पर्यंत टिकुन राहिली.दुसरीकडे महाविकास आघाडीच्या  नेत्यांनी,कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. आघाडीच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये यासाठी पोलिसांनी मतमोजणी केंद्र परिसरात बंदोबस्त वाढवला.विजयी उमेदवारांची घोषणा होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी करत फटाक्यांची आतषबाजी करीत विजयी उमेदवारांसोबत जल्लोष केला.

हे आहेत विजयी उमेदवार -

  • अनिल जनार्धन केणी 
  • राजेश लक्ष्मण खानवाखर
  • हितेन बिहारीलाल शहा
  • दिलिप शंकरराव कदम
  • बळीराम परशुराम म्हात्रे 
  • ज्ञानेश्वर धोंडु बडे 
  • प्रविण पोपटराव जाधव
  • जनर्दन पांडुरंग पाटील 
  • विदया भास्कर चव्हाण 
  • विमल मल्लीनाथ गायकवाड
  • बाबुराव हरिभाऊ पालकर
  • अरविद महादेव सावळेकर 
  • पांडुरंग बंडू भगवंत


 

Web Title: Panvel Urban Bank was dominated by Maha Vikas Aghadi cooperation panel and all BJP candidates were defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.