नारायण राणे अलिबाग न्यायालयात हजर राहणार; माजी CM उद्धव ठाकरेंवरील आक्षेपार्ह विधनाबाबत खटला सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 12:59 PM2022-12-01T12:59:11+5:302022-12-01T13:02:35+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबाबत नारायण राणे यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात 24 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता.

Narayan Rane to appear in Alibag court; Case about objectionable words against ex-CM Uddhav Thackeray | नारायण राणे अलिबाग न्यायालयात हजर राहणार; माजी CM उद्धव ठाकरेंवरील आक्षेपार्ह विधनाबाबत खटला सुरू

नारायण राणे अलिबाग न्यायालयात हजर राहणार; माजी CM उद्धव ठाकरेंवरील आक्षेपार्ह विधनाबाबत खटला सुरू

Next

अलिबाग - जन आशीर्वाद यात्रेनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे याची सोमवारी 23 ऑगस्ट रोजी दक्षिण रायगडमध्ये यात्रा सुरू झाली होती. या यात्रेदरम्यान महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले होते. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राणे याना संगमेश्वर येथून त्यांना अटक केली होती. गुरुवारी १ डिसेंबर रोजी अलिबाग जिल्हा न्यायालयात केंद्रीय मंत्री नारायण राणे सुनावणीसाठी हजर झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबाबत नारायण राणे यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात 24 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर महाड न्यायालयाने त्यांना अटी शर्थीवर जामीन मंजूर केला होता. महाड न्यायलायातून राणे यांचा खटला अलिबाग जिल्हा न्यायालयात वर्ग झालेला आहे. आज जिल्हा न्ययलायात खटल्याची सुनावणी होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वतः उपस्थित राहणार असून वकिलांची फोज त्याच्या सोबत आहे.

Web Title: Narayan Rane to appear in Alibag court; Case about objectionable words against ex-CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.