...ही मंडळी आज आम्हाला तत्वज्ञान सांगायला निघाली; राधाकृष्ण विखे पाटलांची ‘मविआ’ वर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 08:51 PM2023-06-08T20:51:04+5:302023-06-08T20:51:30+5:30

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात नको त्या गोष्टींचे उदात्तीकरण झाले

...This congregation has set out to tell us philosophy today Radhakrishna Vikhe Patal's 'Mavia' criticism | ...ही मंडळी आज आम्हाला तत्वज्ञान सांगायला निघाली; राधाकृष्ण विखे पाटलांची ‘मविआ’ वर टीका

...ही मंडळी आज आम्हाला तत्वज्ञान सांगायला निघाली; राधाकृष्ण विखे पाटलांची ‘मविआ’ वर टीका

googlenewsNext

बारामती : महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात नको त्या गोष्टींचे उदात्तीकरण झाले. औरंजेबाच्या कबरीवर फुले वाहणारांचे उदात्तीकरण होते, याचा अर्थ काय? लव्ह जिहादची प्रकरणे वाढत चालली आहेत. शेरगील उस्मानची सभा झाली, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अल्पवयीन मुलींना पळविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाले. त्यावेळी मविआ सरकारने मतांच्या राजकारणासाठी बघ्याची भूमिका घेतली. हीच मंडळी आज आम्हाला तत्वज्ञान सांगायला निघाली आहेत, अशा शब्दात  असा आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माविआच्या नेत्यांवर टिका केली.

 बारामतीत संत तुकाराम पालखी मुक्काम सोहळ्याची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विखे-पाटील यांनी हि टीका केली.ते पुढे म्हणाले,आमच्या सरकारमध्ये सगळ्या समाजविघातक शक्तींविरोधात कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अशा समाजविघातक शक्ती राज्यात डोके वर काढत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. औरंगेबाचे फोटो नाचविण्याचे धाडस होते, त्यावर मविआ नेते चुप्पी साधून आहेत. त्यांचा हा दुटप्पीपणा जनतेसमोर आहे. परंतु अशा नाचणारांचे नाचणे कायमस्वरुपी बंद करावे लागेल,असे विखे पाटील म्हणाले. राज्यात सामाजिक शांतता टिकवणे हे राज्य सरकारचे दायित्व आहेत. यात जनतेनेही सहकार्य करावे. परंतु सध्या राज्यात सुरु असलेले प्रकार हे सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप  महसूल मंत्री  विखे-पाटील यांनी केला.

...त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे

राज्यातील दंगलींबाबत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केल्याच्या प्रश्नावर विखे पाटील म्हणाले,  संजय राऊत हे वाया गेलेले प्रकरण आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. माझा माध्यम प्रतिनिधींना सल्ला आहे की, त्यांच्यापासून तुम्हा सावध राहिले पाहिजे.  

...माहिती घेवूनच प्रतिक्रिया देईन

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संभाजीनगर नव्हे तर औरंगाबादच म्हणणार, असे सांगितल्याच्या पत्रकारांच्या  प्रश्नावर यासंबंधी माहिती नाही. माहिती घेवूनच प्रतिक्रिया देईन ,असे महसुलमंत्री राधाकृष्ण  विखे पाटील म्हणाले.

Web Title: ...This congregation has set out to tell us philosophy today Radhakrishna Vikhe Patal's 'Mavia' criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.