तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी पोलीसदलही सज्ज; यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 06:48 PM2023-06-08T18:48:56+5:302023-06-08T18:49:09+5:30

पालखी सोहळ्यासाठी पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, २७५ पुरुष पोलीस अंमलदार, १५० महिला पोलीस अंमलदार, २०० होमगार्ड

Police force is also ready for Tukob's palanquin ceremony; This year, for the first time, large-scale settlement | तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी पोलीसदलही सज्ज; यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त

तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी पोलीसदलही सज्ज; यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त

googlenewsNext

देहूगाव : श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्यासाठी पोलीसदलही सज्ज झाले असून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालखी सोहळ्यासाठी यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. पालखी सोहळा सुखरुप व सुरक्षित पार पडावा यासाठी हा बंदोबस्त देण्यात आला आहे. 

पालखी सोहळ्यासाठी १५ पोलीस निरिक्षक, ६० सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, २७५ पुरुष पोलीस अंमलदार, १५० महिला पोलीस अंमलदार, २०० होमगार्ड, एसआरपीची एक प्लाटून, व स्टाईकिंग फोर्सची एक प्लाटून असा पोलीस बंदोबस्त असणार आहे. 

पालखी सोहळ्याच्या कालावधीत वहातुक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी १ पोलीस उपायुक्त, १ सहाय्यक पोलीस आयुक्त, ६ पोलीस निरिक्षक, २१ पोलीस उपनिरिक्षक, १२५ वाहतुक पोलीस कर्मचारी व ३५ वार्डन सज्ज असणार असल्याची माहिती वहातुक पोलीस निरिक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली.

Web Title: Police force is also ready for Tukob's palanquin ceremony; This year, for the first time, large-scale settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.