पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 10:48 AM2021-10-26T10:48:42+5:302021-10-26T11:17:24+5:30

काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या आज साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले

A leopard attacks a young man walking on a morning walk in Hadapsar, Pune | पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देहल्ल्यानंतर गेल्या तीन तासात कोणालाही बिबट्या आढळून आलेला नाही

पुणे : गेल्या काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या आज साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले. या घटनेमुळे हडपसर परिसरातील साडेसतरा नळी, भोसले वस्ती, गोसावी वस्ती या भागात दहशत निर्माण झाली आहे. 

संभाजी बबन आतोडे (रा. गोसावी वस्ती) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. संभाजी आटोळे व त्याचा मित्र अमोल लोंढे हे दोघे आज पहाटे साडेपाच वाजता मार्निंग वॉकला जात होते. त्यावेळी गवतात लपून बसलेल्या बिबट्याने डाव्या बाजूने संभाजी आतोडे यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याच्या पंजाचा फटका बसल्याने त्यात संभाजी आतोडे यांचा डावा हात रक्ताने माखला होता. त्यांनी आरडाओरडा करताच बिबट्या पळून गेला. आटोळे यांना सुरुवातीला जवळच्या यश हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती समजताच हडपसर पोलीस, अग्निशमन दल आणि वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या हल्ल्यानंतर गेल्या तीन तासात कोणालाही बिबट्या आढळून आलेला नाही.

Web Title: A leopard attacks a young man walking on a morning walk in Hadapsar, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.