दौंडमध्ये पिस्तूलचा धाक दाखवून माजी नगराध्यक्षकाच्या मुलाने केला बलात्कार; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 12:15 PM2022-12-09T12:15:31+5:302022-12-09T12:33:14+5:30

आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Former mayor's son raped at gunpoint in Daund Filed a case pune crime news | दौंडमध्ये पिस्तूलचा धाक दाखवून माजी नगराध्यक्षकाच्या मुलाने केला बलात्कार; गुन्हा दाखल

दौंडमध्ये पिस्तूलचा धाक दाखवून माजी नगराध्यक्षकाच्या मुलाने केला बलात्कार; गुन्हा दाखल

googlenewsNext

दौंड (पुणे) : येथील वसीम शेख (रा. कुंभारगल्ली, दौंड) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम शेख हा माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांचा मुलगा आहे. बादशाह शेख आणि वसीम शेख यांच्यासह कुटुंबातील काही व्यक्तींवर विनयभंग, ॲट्रॉसिटी, मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

आरोपीला मदत केल्याप्रकरणी वसीम शेख याच्या कुटुंबातील अन्य पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते. दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसीम याने एका ३३ वर्षीय महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध शहरातील विविध ठिकाणी नेऊन पिस्तूलचा धाक दाखवून तिचे अश्लील व्हिडीओ काढले. कुटुंबीयांना मारून टाकण्याची धमकी देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. हा सर्व प्रकार दि. १९ डिसेंबर २०११ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Former mayor's son raped at gunpoint in Daund Filed a case pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.