फ्लॅटच्या व्यवहारातून वाद; शिवसेना नगरसेवकाने फसवणूक केल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 02:28 PM2021-11-28T14:28:47+5:302021-11-28T14:28:56+5:30

व्यावसायिक प्रितेश दुगड यांनी शिवसेनेचे नगरसेवक नीलेश बारणे यांनी फसवणूक केल्याची तर दुसऱ्या प्रकरणात दुगड यांनी खंडणीची मागणी केल्याची फिर्याद देण्यात आली.

disputes over flat dealings complaint of cheating by Shiv Sena corporator | फ्लॅटच्या व्यवहारातून वाद; शिवसेना नगरसेवकाने फसवणूक केल्याची तक्रार

फ्लॅटच्या व्यवहारातून वाद; शिवसेना नगरसेवकाने फसवणूक केल्याची तक्रार

Next

पिंपरी : थेरगाव येथील फ्लॅटच्या व्यवहारातून वाद झाला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. २६) वाकड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल झाला. यात व्यावसायिक प्रितेश दुगड यांनी शिवसेनेचे नगरसेवक नीलेश बारणे यांनी फसवणूक केल्याची तर दुसऱ्या प्रकरणात दुगड यांनी खंडणीची मागणी केल्याची फिर्याद देण्यात आली.   

प्रितेश प्रकाश दुगड (वय ४९, रा. मित्रमंडळ चौक, पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, शिवसेनेचे नगरसेवक नीलेश हिरामण बारणे, तसेच अविनाश लाला बारणे (वय ४४), महेश हिरामण बारणे (तिघेही रा. थेरगाव) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक नीलेश बारणे, तसेच अविनाश बारणे व महेश बारणे यांच्या भागीदारीतील समर्थ लॅंडमार्क या संस्थेच्या थेरगाव येथील गृहप्रकल्पात फिर्यादी प्रितेश दुगड यांनी स्वत: एक फ्लॅट तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे देखील एक फ्लॅट असे दोन फ्लॅट खरेदी केले. त्यानंतर फिर्यादीने दोन्ही फ्लॅटचा ताबा मागितला असता, ताबा दिला नाही. तसेच समर्थ लॅंडमार्कच्या भागीदारांनी गृहप्रकल्पातील सर्व फ्लॅट बँकेकडे गहाण ठेवून पाच व सात कोटी रुपये कर्ज घेतले. मात्र या फ्लॅटवर कोणताही बोजा नाही, असे सांगून फिर्यादी व त्यांच्या पत्नीला फ्लॅटची विक्री केली. मात्र फ्लॅटचा ताबा न देता तसेच फिर्यादीचे पैसे परत न करता फसवणूक केली.  

याच्या परस्पर विरोधात अविनाश बारणे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार प्रितेश दुगड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दुगड यांनी शांताई पार्क, थेरगाव या प्रोजेक्टमध्ये ४९ लाख ६७ हजार ७०० रुपयांना फ्लॅट खरेदी केले. त्या फ्लॅटचा ताबा वेळेवर दिला नाही, तसेच गृहप्रकल्पावर बँकेकडून कर्ज काढले. या कारणावरून दुगड यांनी फ्लॅटचा ताबा घेण्यास नकार दिला. तसेच फिर्यादी अविनाश बारणे यांच्याकडे दीड कोटी रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दुगड यांनी दिली.

Web Title: disputes over flat dealings complaint of cheating by Shiv Sena corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.