PHOTOS | श्रीराम नामाचा गजर करीत राममंदिरात निनादले पाळण्याचे स्वर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 03:33 PM2023-03-30T15:33:39+5:302023-03-30T15:45:58+5:30

बाळा जो जो रे... दशरथ नंदना... बाळा जो जो रे... चे स्वर आणि श्रीराम नामाच्या अखंड जयघोषाने पेशवेकालीन तुळशीबाग श्रीराम मंदिरात निनादले. पुणेरी पगडी आणि पारंपरिक वेशात सहभागी रामभक्तांच्या गर्दीने फुललेल्या मंदिरात २६२ व्या वर्षी श्रीरामनवमी उत्सव थाटात साजरा झाला. दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी मंदिराच्या सभामंडपात लावलेला पाळणा हलला आणि रामनामाचा एकच नामघोष झाला. भक्तांनी फुलांची उधळण करीत श्रीरामजन्म सोहळा प्रत्यक्षपणे अनुभवला.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग येथील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

मंदिरात सकाळी पवमान अभिषेकाने सोहळ्याला प्रारंभ झाला. मंदिरात आकर्षक पुष्पसजावट व विविधरंगी लाईटची विद्युतरोषणाई करण्यात आली होती

मंदिराच्या परिसरात श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली.

कीर्तन व पाळणा म्हणजेच रामजन्म सोहळा झाल्यानंतर पागोट्याचा प्रसाद घेण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

कीर्तनकार ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांचे रामजन्माचे कीर्तन झाले