लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी अल्पवयीन मुलगी गर्भवती

By दयानंद पाईकराव | Published: March 30, 2023 07:06 PM2023-03-30T19:06:32+5:302023-03-30T19:07:04+5:30

Nagpur News अल्पवयीन असताना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर एका मुलीला बाळ झाले. परत दुसऱ्यांदा  मुलगी गर्भवती झाल्यामुळे  गर्भपात करण्यासाठी गेली असता ती अल्पवयीन असल्याचा खुलासा झाला.

A minor girl living in a live-in relationship is pregnant | लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी अल्पवयीन मुलगी गर्भवती

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी अल्पवयीन मुलगी गर्भवती

googlenewsNext

दयानंद पाईकराव

नागपूर : अल्पवयीन असताना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर एका मुलीला बाळ झाले. परत दुसऱ्यांदा  मुलगी गर्भवती झाल्यामुळे  गर्भपात करण्यासाठी गेली असता ती अल्पवयीन असल्याचा खुलासा झाला. वाडी पोलिसांनी तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीस अटक केली.

कैलास राजकुमार अडमाचे (२५, म्हाडा कॉलनी आठवा मैल वाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मजुरी करतो. आरोपीने अल्पवयीन १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिला १४ फेब्रुवारी २०२० ते २७ मार्च २०२३ दरम्यान आपल्या घरी नेऊन तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून या मुलीला एक बाळ झाले. दोघेही दोन वर्षांपासून लिव्ह ईन मध्ये राहत होते. त्यानंतर अल्पवयीन मुलगी पुन्हा गर्भवती झाली. गर्भपात करण्यासाठी ती रुग्णालयात गेली असता तेथे ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांना समजले. त्यांनी वाडी पोलिसांना सुचना दिली. वाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३७६ (२) (एन), ४१७ नुसार तसेच सहकलम ४, ६, ८, १० पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पिडीत मुलीला तिच्या आईसोबत पाठविण्यात आले आहे.

Web Title: A minor girl living in a live-in relationship is pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.