"लखीमपूरवरून इथे बंद करणाऱ्या ठाकरे सरकारला लातूरच्या शेतकऱ्यांची दखल घ्यावी वाटत नाही" 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 04:00 PM2021-10-12T16:00:44+5:302021-10-12T16:02:47+5:30

BJP Keshav Upadhye Slams Thackeray Government : एका शेतकऱ्यांची तब्येत बिघडली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

BJP Keshav Upadhye Slams Thackeray Government Over Latur Farmers | "लखीमपूरवरून इथे बंद करणाऱ्या ठाकरे सरकारला लातूरच्या शेतकऱ्यांची दखल घ्यावी वाटत नाही" 

"लखीमपूरवरून इथे बंद करणाऱ्या ठाकरे सरकारला लातूरच्या शेतकऱ्यांची दखल घ्यावी वाटत नाही" 

Next

मुंबई - लातूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचं 72 तासांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. यामध्ये एका शेतकऱ्यांची तब्येत बिघडली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "लखीमपूरवरून इथे बंद करणाऱ्या ठाकरे सरकारला मात्र अद्याप लातूरच्या शेतकऱ्यांची दखल घ्यावी वाटत नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. "अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी लातूर येथे 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरू केलेल्या शेतकऱ्यांपैकी १ शेतकऱ्यांची तब्येत बिघडली असून त्याला ॲडमिट केले आहे. लखीमपूरवरून इथे बंद करणाऱ्या ठाकरे सरकारला मात्र अद्याप या शेतकऱ्यांची दखल घ्यावी वाटत नाही" असं म्हणत केशव उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) येथे एका वेगवान कारने शेतकऱ्यांना चिरडण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या घटनेचा निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) राज्यभरात हा बंद पुकारला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना शांततेत बंद करावा असं आवाहन करण्यात आले होते. अनेकांनी या बंदवरून ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीकास्त्र सोडलं. मनसेने (MNS) देखील "मुंबईचे अनभिषिक्त 'बंदसम्राट'" असं म्हणत जोरदार निशाणा साधला होता. 

"वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला"

महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (MNS Kirtikumar Shinde) यांनी ठाकरे सरकारला महाराष्ट्र बंदवरून सणसणीत टोला लगावला आहे. "मुंबईचे अनभिषिक्त 'बंदसम्राट'- कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या नंतरचे खरे राजकीय 'बंदसम्राट' म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच. त्या काळी शिवसेनेच्या वाघाने एक डरकाळी फोडली की, कडकडीत बंद पाळला जायचा. आताच्या शिवसेना कार्यप्रमुखांना- स्वतः मुख्यमंत्री असूनही- पोलिसांच्या गराड्यात दुकानदारांना 'बंद करा' 'बंद करा' असं सांगत 'म्याव म्याव' आवाहन करावं लागतं! वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला यात आश्चर्य नाही. काय वाटलं असेल आज वंदनीय बाळासाहेबांना?" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. 
 

Web Title: BJP Keshav Upadhye Slams Thackeray Government Over Latur Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.