देवणी आणि रेणापूर येथे तलाठी संघाचे एक दिवसीय धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 04:58 PM2021-10-11T16:58:28+5:302021-10-11T16:59:47+5:30

ई-महाभूमी राज्य प्रकल्प समन्वयक यांची बदली करण्याची केली मागणी

One day dharna agitation of Talathi Sangh at Devani and Renapur | देवणी आणि रेणापूर येथे तलाठी संघाचे एक दिवसीय धरणे आंदोलन

देवणी आणि रेणापूर येथे तलाठी संघाचे एक दिवसीय धरणे आंदोलन

Next

लातूर : महाराष्ट्र राज्य तलाठी संघ तालुका शाखा देवणी आणि रेणापूर यांच्यातर्फे सोमवारी  तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.हे आंदोलन ई महाभूमी राज्य प्रकल्प समन्वयक यांनी तलाठी संवर्गासाठी असंविधानिक शब्द वापरल्याने झाले.  त्यांची तात्काळ इतर विभागात बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.

देवणी येथील धरणे आंदोलनात तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष गोपाळ बिरादार उपाध्यक्ष अतिश बनसोडे सरचिटणीस धनराज भंडारे जिल्हा प्रतिनिधी उद्धव जाधव मार्गदर्शक ए एस सुरवसे यांच्यासह मंडळ अधिकारी श्रीमती अनिता ढगे व तलाठी पीटी भंडारे डी एस कुंभार एल एन कांबळे यु एन जाधव शेख अब्रार व श्रीमती अनिता निगुले यांच्यासह सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सहभागी होते.

तर रेणापूर येथील आंदोलनात तालुका अध्यक्ष भुसनर डीबी, उपाध्यक्ष टीव्ही सूर्यवंशी, एम.बी. सय्यद रेणापूर तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी बी.बी सुरवसे ,आर.एन भोसले, के.जी तिडके, एस एस पवार, श्रीमती एस एन गुडे, गोविंद शिंगडे ,एस एस कुलकर्णी, महेश हिप्परगे, दिलीप देवकते, जायभाये एस आर यांच्यासह तलाठी संघाचे पदाधिकारी व तलाठी सहभागी झाले होते.

Web Title: One day dharna agitation of Talathi Sangh at Devani and Renapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.