ज्येष्ठ अर्थतज्ञ जे. एफ. पाटील अनंतात विलीन, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 11:02 AM2022-12-08T11:02:05+5:302022-12-08T11:03:08+5:30

कोल्हापूर : ज्येष्ठ अर्थतज्ञ  जे. एफ. पाटील यांचे काल, बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, गुरूवारी सकाळी पंचगंगा ...

Senior Economist J. F. Patil last rites | ज्येष्ठ अर्थतज्ञ जे. एफ. पाटील अनंतात विलीन, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली 

ज्येष्ठ अर्थतज्ञ जे. एफ. पाटील अनंतात विलीन, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली 

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ अर्थतज्ञ  जे. एफ. पाटील यांचे काल, बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, गुरूवारी सकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शिक्षण, उद्योग, व्यापार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थ्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. रक्षाविसर्जन शनिवारी (दि.१०) होणार आहे. 

सम्राटनगर येथील निवासस्थानापासून डॉ. पाटील यांची अंत्ययात्रा सुरू झाली. प्रतिभानगर, गोखले कॉलेज, दसरा चौक मार्गे ती पंचगंगा स्मशानभूमीत आली. सव्वा नऊ वाजता मुलगा अभिनंदन यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी डॉ. पाटील यांचे बंधू अशोक पाटील, पुतणे चेतन पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर,  भालबा विभूते, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले,

डी. वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरू राकेश कुमार मुदगल, कुलसचिव विश्वनाथ भोसले, समाजवादी प्रबोधिनीचे  टी. एस. पाटील, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष आनंद माने, स्मॅकचे माजी अध्यक्ष सुरेंद्र जैन, भैय्या माने, संजय जाधव, विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले नंदू माने, डी.आर.मोरे, ओमप्रकाश कलमे, विजय काकडे, सुभाष कोंबडे, राहुल म्होपरे, रघुनाथ ढमकले, आदी उपस्थित होते. 

शोकसभा सोमवारी... 

डॉ. पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवारी (दि.१२) दुपारी चार वाजता दसरा चौक येथील जैन बोर्डिंग च्या सभागृहात शोकसभा होणार आहे इचलकरंजी येथे बुधवारी (दि.१४) दुपारी चार वाजता समाजवादी प्रबोधिनीमध्ये शोकसभा आयोजित केली आहे.

Web Title: Senior Economist J. F. Patil last rites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.