पिलावरेवाडी येथे भूस्खलन होऊन शेती पिकाचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2022 01:55 PM2022-08-14T13:55:57+5:302022-08-14T13:56:06+5:30

अतिरीक्त पावसाचा परिणाम ;गतसाल ही या गावात झाले होते भुस्खलन

Massive damage to agricultural crops due to landslides in Pilawrewadi | पिलावरेवाडी येथे भूस्खलन होऊन शेती पिकाचे प्रचंड नुकसान

पिलावरेवाडी येथे भूस्खलन होऊन शेती पिकाचे प्रचंड नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड :  पिलावरेवाडी ( ता. राधानगरी ) येथे गेल्या दोन आठवडयापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील  जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे . त्यातच या पावसाने पिलावरेवाडी गावानजीक 'घोळ ' नावाच्या शेतात मोठे भुस्खलन होऊन शिवारातील भात शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे . जवळपास २ते २ .५हेक्टर क्षेत्रावरील भात पिक घसरत जाऊन पिक गडप झाले आहे . या पावसाचा अधिक फटका हा नदी-नाले,ओढ्याशेजारी असणाऱ्या शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे . नदी काठाची शेती पाण्याच्या प्रवाहाने अक्षरशः धुवून नेली असून. नदीकाठावर चे विद्युत पंप विहिरी यांचेही नुकसान झालेआहे.

       केळोशी बु॥नजीकच्या पिलावरेवाडी येथील 'घोळ ' नावाच्या शिवारा दरम्यान मोठया प्रमाणात भूस्खलन होऊन डोंगराचा बहुतांशी भाग तिन ते चार  फुटाने खाली सरकला आहे . त्यामुळे येथील चंदर रामा पिलावरे, विलास रामा पिलावरे व प्रकाश भाऊ पिलावरे या शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या तीन शेतकऱ्यांची जवळपास अडीच हेक्टर जमीन तीन ते चार फुटाणे खचून ओढ्याकडील बाजूला सरकत गेली आहेत . तर या खचलेल्या जमिनीचा काही भाग दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शिवारात धुवून गेल्याने त्यांच्याही शेतीचे नुकसान झाले आहे . या परिसरात गेल्या आठ दिवसात जोरदार पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांच्या नदी नजीकच्या विहिरीव विद्युत पंपांचेही नुकसान झाले आहे .

       सदर ठिकाणी तात्काळ भेट देऊन तलाठी रणजीत पाटील,सरपंच के .एल. पाटील , ग्रामसेवक श्री . बागडी ,कृषी सहाय्यक तानाजी परीट , यु .जी .नाधवडेकर , कोतवाल संतोष पाटील, पोलास पाटील शशिकांत दिघे पंचनाम करून पुढील कार्यवाही साठी पाठवला आहे .
चौकट- गतसाली .या परिसरात ८९५ मिलिमीटर इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस एका दिवसात पडल्यामुळे या परिसरातील माळवाडी ,केळोशी, आपटाळ,माळवाडी, शिंदेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते . यावर्षी अशाच पद्धतीचे भूस्खलन झाल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

Web Title: Massive damage to agricultural crops due to landslides in Pilawrewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.