बोगस ठेकेदाराच्या जोखंडातून मिरज-कळंबी रस्त्याला स्वातंत्र्य मिळवून द्या; सांगली मनसेची मागणी

By संतोष.मिठारी | Published: August 15, 2022 12:45 PM2022-08-15T12:45:18+5:302022-08-15T12:45:31+5:30

कोल्हापुरात राजमार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

Free the Miraj-Kalambi road from the yoke of bogus contractor; Sangli MNS demand | बोगस ठेकेदाराच्या जोखंडातून मिरज-कळंबी रस्त्याला स्वातंत्र्य मिळवून द्या; सांगली मनसेची मागणी

बोगस ठेकेदाराच्या जोखंडातून मिरज-कळंबी रस्त्याला स्वातंत्र्य मिळवून द्या; सांगली मनसेची मागणी

googlenewsNext

कोल्हापूर : मिरज- कळंबी रस्ते कामाचा ठेका तातडीने रद्द करुन बोगस ठेकेदार कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. बोगस ठेकेदाराच्या जोखंडातून या रस्त्याला स्वातंत्र्य मिळवून द्या, अशी मागणी सांगलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रणित रस्ते, साधन- सुविधा व आस्थापना आघाडीने  सोमवारी केली.

या मागणीसाठी कोल्हापुरातील उजळाईवाडी येथील राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर या आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मनसेसांगली जिल्हा संघटक संकेत झुरे,  शहर अध्यक्ष विनय पाटील,सागर चव्हाण,  सागर सुतार,  अरविंद कांबळे, सतीश येताळ,  आकाश पाटील,  प्रशांत हेरवाडे, सौरभ पाटील,  अजय खांडेकर, प्रसाद हेरवाडे, आदी सहभागी झाले. 

मिरज- कळंबी या रस्ते कामाचा ठेकेदार कंपनीने कामशेत व मिरज येथे निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. त्याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कंपनीस तात्काळ काळ्या यादीत टाकावे.या कंपनीचा व्यवसाय परवाना तातडीने रद्द करण्यात यावा.संबंधित ठेकेदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या ६ महिन्यांपासून मनसे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याशी पत्र व्यवहार करत आहे. मात्र संबंधित कार्यालयाकडून ठेकेदारास पाठीशी घातले जात असून याच्या निषेधार्थ स्वातंत्र्य दिनी धरणे आंदोलन करण्यात आले असल्याचे संकेत झुरे आणि विनय पाटील यांनी सांगितले.

Web Title: Free the Miraj-Kalambi road from the yoke of bogus contractor; Sangli MNS demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.