जळगाव जिल्ह्यातून तीन गुन्हेगार हद्दपार, जिल्हा पोलिसांकडून कारवाई

By सागर दुबे | Published: December 5, 2022 10:13 PM2022-12-05T22:13:25+5:302022-12-05T22:15:00+5:30

तीन गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Three criminals deported from Jalgaon district action taken by district police | जळगाव जिल्ह्यातून तीन गुन्हेगार हद्दपार, जिल्हा पोलिसांकडून कारवाई

जळगाव जिल्ह्यातून तीन गुन्हेगार हद्दपार, जिल्हा पोलिसांकडून कारवाई

googlenewsNext

जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा बसावा व गुंडांपासून नागरिकांचे रक्षण व्हावे या हेतून जळगाव जिल्ह्यातून रावेर येथील तीन गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जावेद शेख लुकमान (२७), सादीक शेख लुकमान (२३), सद्दाम शेख लुकमान (२०, सर्व रा. हत्तेहनगर, रावेर) असे हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

जावेद, सादीक आणि सद्दाम हे गुंडगिरी करून रावेर शहरासह नजीकच्या गावांमध्ये दहशत पसरवित होते. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणात होत नव्हती. त्यामुळे त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यामुळे जनतेच्या जिविताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे, असे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले होते.

त्यामुळे तिघांचा हद्दपार प्रस्ताव हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर प्रस्तावाची उपविभागीय पोलिस अधिका-यांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी तिघांना हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. सहा महिन्यांसाठी तिघांना हद्दपार करण्यात आले आहे

 

Web Title: Three criminals deported from Jalgaon district action taken by district police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.