Independence Day 2022 : रेकॉर्डब्रेक! अमळनेरमध्ये ३३०० फूट तिरंगा रॅली; साडेसात हजार जणांनी म्हटलं सामूहिक राष्ट्रगीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 03:56 PM2022-08-15T15:56:44+5:302022-08-15T16:09:45+5:30

Independence Day 2022 : ३३०० फूट तिरंगा रॅली काढण्यात आली तसेच सुमारे साडे सात हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणून आणखी एक नवा इतिहास घडवण्यात आला.

Independence Day 2022 3300ft Tiranga Rally in Amalner; 7500 people sang the national anthem | Independence Day 2022 : रेकॉर्डब्रेक! अमळनेरमध्ये ३३०० फूट तिरंगा रॅली; साडेसात हजार जणांनी म्हटलं सामूहिक राष्ट्रगीत 

Independence Day 2022 : रेकॉर्डब्रेक! अमळनेरमध्ये ३३०० फूट तिरंगा रॅली; साडेसात हजार जणांनी म्हटलं सामूहिक राष्ट्रगीत 

googlenewsNext

अमळनेर - महसूल व पालिका प्रशासनातर्फे १५ ऑगस्ट रोजी १ किमी म्हणजे ३३०० फूट तिरंगा रॅली काढण्यात आली तसेच सुमारे साडे सात हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणून आणखी एक नवा इतिहास घडवण्यात आला. १५ रोजी सकाळी शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, डॉ अनिल शिंदे, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, डी वाय एस पी राकेश जाधव, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गटशिक्षणाधिकारी एस पी चव्हाण,बजरंग अग्रवाल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. मंगलमूर्ती चौक, रेल्वे स्टेशन चौक, स्वामीनारायण मंदिर, नगरपालिका, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा, तिरंगा चौक, पाचपावली मंदिर, बसस्थानक, महाराणा प्रताप चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापर्यंत रॅली काढण्यात आली.

रॅलीच्या सुरुवातीला भारत मातेच्या रुपात माजी सैनिकांची गाडी होती. त्याचे सारथ्य धनराज पाटील यांनी केले. त्यांनतर ७५ स्वातंत्र्य सैनिक, विविध क्रांतिकारक यांच्या वेशात सानेगुरुजी शाळेचे विदयार्थ , देशाच्या विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारे मुंदडा ग्लोबल शाळेचे विद्यार्थी, त्यानंतर प्रताप महाविद्यालय, जि एस हायस्कूल, स्वामी विवेकानंद स्कूल, डी आर कन्याशाळा, सावित्रीबाई फुले कन्याशाळा, उर्दू हायस्कूल, जययोगेश्वर माध्यमिक विद्यालय, लोकमान्य शाळा यांच्यासह विविध शाळांनी तिरंगा पेलून धरला होता. 

रॅलीत ठिकठिकाणी तिरंग्यावर तसेच भारत माता व प्रतिकात्मक क्रांती वीर, स्वातंत्र्यसैनिक यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. रॅली संपल्यानंतरर सुमारे साडे सात हजार  विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हटले. रॅलीत उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, खान्देश शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन नीरज अग्रवाल, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, अर्बन बँकेचे माजी चेअरमन पंकज मुंदडा, प्रकाश मुंदडा, मंगळ ग्रह मंदिराचे अद्यक्ष दिगंबर महाले, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोडे, पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, अभियंता अमोल भामरे, अभियंता दिगंबर वाघ, अभियंता सत्येम पाटील संजय चौधरी, गोपनीय अंमलदार शरद पाटील  यांच्यासह समाजातील सर्व क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते. 

बजरंग सुपर मार्केट तर्फे विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला. रॅली यशस्वी करण्यासाठी खान्देश रक्षक संघटना, आजी माजी सैनिक, एनसीसी कॅडेट, पत्रकार संघटना, तालुका क्रीडा संघटना, तलाठी संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, नगरपालिका, पोलीस, होमगार्ड यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.डी जे वर देशभक्तीपर गीते आणि भारत माता की जय च्या घोषणांनी अमळनेर शहर दुमदुमले होते.


 

Web Title: Independence Day 2022 3300ft Tiranga Rally in Amalner; 7500 people sang the national anthem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.