मंदिरांसह चार घरे फोडली; बचत गटातून काढलेली कर्जाची ११ हजाराची रक्कमही लांबविली

By संजय पाटील | Published: June 2, 2023 09:51 AM2023-06-02T09:51:46+5:302023-06-02T10:34:32+5:30

गरीब शेतमजुरांचे सोने- चांदीसह   एक लाख रुपये चोरून नेले. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

Four houses along with temples were robbed; The loan amount of 11,000 taken from the self-help group was also postponed | मंदिरांसह चार घरे फोडली; बचत गटातून काढलेली कर्जाची ११ हजाराची रक्कमही लांबविली

मंदिरांसह चार घरे फोडली; बचत गटातून काढलेली कर्जाची ११ हजाराची रक्कमही लांबविली

googlenewsNext

अमळनेर (जि.जळगाव) : अमळनेर तालुक्यातील दोधवद व हिंगोणे खुर्द गावात मंदिरांसह चार घरे चोरट्यांनी फोडली. यात गरीब शेतमजुरांचे सोने- चांदीसह   एक लाख रुपये चोरून नेले. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

 दोधवद येथील भरत झगा भोई हे बाहेर झोपलेले असताना चोरट्यांनी मागच्या बाजूने घरात प्रवेश करून ४० भार चांदी,२ ग्राम सोने व रोख दोन हजार रुपये चोरुन नेले.  जवळच असलेल्या हिंगोणे खुर्द गावात पांडुरंग हिंमत कोळी या मजुराच्या घरातही मागच्या बाजूने प्रवेश करून २० हजार रुपये तर उखा सखाराम कोळी यांच्या पत्नीने काढलेल्या बचत गटाचे कर्जाची रक्कम ११ हजार रुपये लांबविले. 

 तसेच म्हाळसादेवी व दमोता माता मंदिरातील दानपेटीतील सुमारे २० हजार रुपये चोरून नेले आणि दानपेटी गावाबाहेर फेकून दिली. उन्हाळ्यात ग्रामीण भागात लोक बाहेर झोपलेले असतात आणि गरीब मजूर घराला कुलूप देखील लावत नाहीत, त्याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला. घटनेची माहिती मारवड पोलिसांना  कळवण्यात आली आहे.

Web Title: Four houses along with temples were robbed; The loan amount of 11,000 taken from the self-help group was also postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyचोरी