अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान, हताश शेतकऱ्यानं केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 11:46 PM2021-10-17T23:46:31+5:302021-10-17T23:47:03+5:30

विनोद सीताराम पाटील (४०, रा. सातोड ता. मुक्ताईनगर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

Excessive crop damage due to heavy rains, desperate farmer commits suicide | अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान, हताश शेतकऱ्यानं केली आत्महत्या

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान, हताश शेतकऱ्यानं केली आत्महत्या

Next

मुक्ताईनगर जि. जळगाव : तालुक्यात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान पाहून हताश झालेल्या शेतकऱ्याने पूर्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सातोड येथे रविवारी सायंकाळी उघडकीस आली.

विनोद सीताराम पाटील (४०, रा. सातोड ता. मुक्ताईनगर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मुक्ताईनगर तालुक्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. विनोद हे रविवारी दुपारी पिकांची पाहणी करण्यासाठी शेतात गेले होते. पिकांचे नुकसान पाहून त्यांचा धीर सुटला. यानंतर ते घरी परतले आणि काही वेळाने खामखेडा येथील पुलावरून त्यांनी पूर्णा नदीत उडी घेत आत्महत्या केली.

Web Title: Excessive crop damage due to heavy rains, desperate farmer commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.