कारवर दगडफेक केल्यानंतर तरूणावर धारधार शस्त्राने वार

By सागर दुबे | Published: June 7, 2023 12:36 AM2023-06-07T00:36:30+5:302023-06-07T00:37:38+5:30

जखमी तरुणाची प्रकृती गंभीर; खोटेनगरजवळ घडली घटना.

after throwing stones at the car the youth was stabbed with a sharp weapon | कारवर दगडफेक केल्यानंतर तरूणावर धारधार शस्त्राने वार

कारवर दगडफेक केल्यानंतर तरूणावर धारधार शस्त्राने वार

googlenewsNext

सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : शहरातील खोटेनगरजवळ तीन ते चार जणांनी एका कारवर दगडफेक करून कारमधील अविनाश निंबा अहिरे (३५, रा. कुसूंबा) या तरूणावर धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

जखमीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कुसूंबा येथील अविनाश अहिरे हा मित्र राम सुभाष कुकडे याच्यासोबत खोटेनगरजवळ कार (एमएच. १९. ईए.०४५१) उभी करून त्यामध्ये बसला होता. अचानक तीन ते चार तरूण त्याठिकाणी आले. त्यांनी जून्या वादातून अहिरे व कुकडे यांना मारहाण करून त्यांच्या कारच्या काचेवर दगडफेक केली. यामध्ये कारचे पुढील काच फुटले. नंतर एकाने अहिरे याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. यामध्ये अहिरे हा गंभीर जखमी झाला. कुकडे याने लागलीच अहिरे याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात आणले.

गंभीर दुखापत झाल्यामुळे तरुणाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला तत्काळ अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे रुग्णालयात रात्री गर्दी झाली होती.

Web Title: after throwing stones at the car the youth was stabbed with a sharp weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.