टाकळगाव शिवारात नेऊन तरुणास बेदम मारहाण, उपचारास नेताना झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 03:41 PM2023-05-17T15:41:31+5:302023-05-17T15:41:47+5:30

तरुणास कोणी आणि का मारहाण केली याचा शोध पोलीस घेत आहेत.

The youth was brutally beaten after being taken to Takalgaon Shivara, died while being taken for treatment | टाकळगाव शिवारात नेऊन तरुणास बेदम मारहाण, उपचारास नेताना झाला मृत्यू

टाकळगाव शिवारात नेऊन तरुणास बेदम मारहाण, उपचारास नेताना झाला मृत्यू

googlenewsNext

- इस्माईल जहागिरदार
वसमत (हिंगोली):
शहरातून एका १८ वर्षीय युवकास टाकळगाव शिवारातील शेत आखाड्यावर नेऊन काही जणांनी जबर मारहाण केली. त्यानंतर जखमी युवकास वसमत शहराजवळ सोडून देत आरोपींनी पळ काढला. दरम्यान, जखमी युवकास उपचारासाठी नांदेड येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषीत केले. ही घटना मंगळवारी रात्रीस घडली आहे.

वसमत शहरातून १६ मे रोजी रात्री ८.३० वाजेदरम्यान ओंकार हेरे (१८,ह मु नविन ऐरिकेशन कॉलनी वसमत, रा कन्हेरगाव) या युवकास काही जणांनी टाकळगाव शिवारातील आखाड्यावर नेले. येथे त्याला जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या ओंकारला वसमत शहरातील एका शाळेजवळील शेतात टाकण्यात आले. 

दरम्यान, माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी युवकास नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून ओंकारला मृत घोषीत केले. माहिती मिळताच सपोनि अनिल काचमांडे, फौजदार संदिप यामावार, अविनाश राठोड, संजय गोरे आदी कर्मचाऱ्यांनी टाकळगाव शिवारातील आखाड्यावर जाऊन पाहणी केली.

तरुणास कोणी आणि का मारहाण केली याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, काही आरोपी वसमत शहरातील असल्याची माहिती आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: The youth was brutally beaten after being taken to Takalgaon Shivara, died while being taken for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.