वाहन चालकास डोळा लागला; अनियंत्रित टेम्पो थेट दुकानात घुसला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 01:40 PM2023-05-30T13:40:32+5:302023-05-30T13:43:44+5:30

या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे

The driver was hit in the eye; An uncontrollable tempo hits straight into the shop | वाहन चालकास डोळा लागला; अनियंत्रित टेम्पो थेट दुकानात घुसला

वाहन चालकास डोळा लागला; अनियंत्रित टेम्पो थेट दुकानात घुसला

googlenewsNext

- इस्माईल जाहगीरदार
वसमत (जि. हिंगोली) :
मंगळवारी पहाटे वसमत तालुक्यातील हयातनगर  फाट्यावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात चालकाचा स्टेरिंगवरील ताबा सुटल्याने टेंम्पो घुसला. यामध्ये दुकानातील साहित्याचे नुकसान झाले असून चालक ही गंभीर जखमी झाला आहे ही घटना मंगळवारी सकाळी सहा वाजे दरम्यान घडली.

३० मे रोजी वसमतहून परभणीकडे मालवाहू टेम्पो जात होता. सकाळी सहा वाजे दरम्यान टेम्पोच्या चालकाचे स्टेरिंगवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दुकानात जाऊन घुसला. चालक गंभीर जखमी झाला असून दुकानातील साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती कळताच ग्रामीण हाटा पोलीस ठाण्याचे जमादार जिवन गवारे यांच्या सह आदि पोलीस घटनास्थळी पोहोचले, अपघात कसा झाला याची सखोल माहिती पोलीस घेऊ लागले आहे.

Web Title: The driver was hit in the eye; An uncontrollable tempo hits straight into the shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.