हिंगोलीतील डिग्रस परिसरात जोरदार पाऊस; पाच गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 07:16 PM2022-08-04T19:16:51+5:302022-08-04T19:17:35+5:30

गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.

Heavy rains in Digrus area of Hingoli; Communication of five villages was lost, traffic stopped | हिंगोलीतील डिग्रस परिसरात जोरदार पाऊस; पाच गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प

हिंगोलीतील डिग्रस परिसरात जोरदार पाऊस; पाच गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प

Next

डिग्रस कऱ्हाळे (जि. हिंगोली): हिंगोली तालुक्यातील डिग्रस व परिसरात ४ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेघगर्जनेस जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे पिंपरीच्या ओढ्याला पाणी आले. या पूरामुळे पाच गावांचा संपर्क तुटला.

गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पिंपरीच्या ओढ्याला पूर आला होता. यावेळी डिग्रस फाट्यावर वाहतूक ठप्प झाली. लोहगाव, दाटेगाव, करंजाळा, भोसी, सावळी, गांगलवाडी, खिल्लार आदी दहा ते बारा गावे या रस्त्यावर आहेत. ओढ्याला पूर आल्यामुळे वाहतूक जवळपास तीन तास ठप्प झाली. सायंकाळी साडेवाजेपर्यत तरी पिंपरी ओढ्याला पूर आल्याने दोन्ही बाजूला वाहने उभी होती.

Web Title: Heavy rains in Digrus area of Hingoli; Communication of five villages was lost, traffic stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.