वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; गोरेगाव तालुक्याचाही अनेक गावाशी संपर्क तुटला 

By अंकुश गुंडावार | Published: August 15, 2022 05:25 PM2022-08-15T17:25:56+5:302022-08-15T17:28:22+5:30

...यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझडही झाली आहे.

Wainganga River Exceeds Danger Level Goregaon taluka also lost contact with many villages | वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; गोरेगाव तालुक्याचाही अनेक गावाशी संपर्क तुटला 

वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; गोरेगाव तालुक्याचाही अनेक गावाशी संपर्क तुटला 

googlenewsNext


गोंदिया - जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. तर नदी काठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तिरोडा व गोदिंया तालुक्यातील काही भागांतून ही नदी वाहत असल्याने काटी, बिरसोला येथे वैनगंगा व बाघनदीचा संगम, तसेच महालगाव धापेवाडा येथे चनई नदी आणि चांदोरी खु. येथे बावनथळी नदीचा संगम असून या सर्व नद्यांवर शिरपुरबांध, कालीसराड, पुजारीटोला, संजय सरोवर, इंदिरा सागर बावनथळी प्रकल्प मोठे असून सर्व बांध तुडुंब भरले आहेत. यातील पाणीही मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आले आहे. यामुळे सर्व धरणाचे पाणी वैनगंगा नदीत येत असल्याने वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणावर घरांची पडझडही झाली आहे. मात्र  प्रशासन सुस्त आहे.




गोरेगाव तालुक्याच्या अनेक गावाशी संपर्क तुटला -
24 तासापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. झांजिया जवळील पांगोली नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गोरेगाव सोनी मार्ग बंद आहे कटंगी जवळील पुलावरून पाणी पाहत असल्यामुळे गोरेगाव कुराडी मार्ग बंद आहे. मुंडीपार कमरगाव जवळील पुलावरून पाणी वाहत जात असल्यामुळे मुंडीपार मोहाडी रस्ता बंद आहे पुन्हा एकदा सतत धार पावसामुळे गोरेगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतजमिनी पाण्याखाली आल्याचे चित्र आहे. आज सोमवारी सकाळी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती.

Web Title: Wainganga River Exceeds Danger Level Goregaon taluka also lost contact with many villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.