भरधाव ट्रक काळीपिवळीवर कोसळला; तीन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 09:26 PM2022-11-16T21:26:16+5:302022-11-16T21:26:46+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा ते पाटेकुर्रादरम्यान असलेल्या भुसारीटोला येथील मुख्य मार्गावर गोंदियाकडून-कोहमाराकडे धावणारा ट्रक क्रमांक एमएच ४० वाय ८४८७ व सडक अर्जुनीकडून गोंदियाकडे जाणारी काळी पिवळी एम.एच. ३६, ३१११ ला धडक दिल्याने या काळी पिवळीतील एक जण जागीच ठार तर आठ गंभीर जखमी झाले. त्या आठही जणांना गोंदियाच्या केटीएस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले करण्यात आले. 

Rushing truck crashes on Kalpivali; Three people were killed | भरधाव ट्रक काळीपिवळीवर कोसळला; तीन जण ठार

भरधाव ट्रक काळीपिवळीवर कोसळला; तीन जण ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ गोंदिया ते कोहमारा मार्गावरील भुसारीटोलाजवळ काळी-पिवळी ट्रकची आमरो-समोर धडक झाल्याने काळी पिवळीचा चेंदामेंदा झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.१६) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. 
सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा ते पाटेकुर्रादरम्यान असलेल्या भुसारीटोला येथील मुख्य मार्गावर गोंदियाकडून-कोहमाराकडे धावणारा ट्रक क्रमांक एमएच ४० वाय ८४८७ व सडक अर्जुनीकडून गोंदियाकडे जाणारी काळी पिवळी एम.एच. ३६, ३१११ ला धडक दिल्याने या काळी पिवळीतील एक जण जागीच ठार तर आठ गंभीर जखमी झाले. त्या आठही जणांना गोंदियाच्या केटीएस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले करण्यात आले. 
उपचारादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात श्याम शंकर बंग (७०) रा. गोरेगाव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात अंबिका गोकूलप्रसाद पांडे (६१) रा. चिरचाळी डव्वा, सुरेश शंकर मुनेश्वर (२४) रा. कालीमाटी, ता. आमगाव अशी मृतकांची नावे आहेत. 
गंभीर असलेल्या सहा जणांवर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वांगळे, सहायक फौजदार सांदेकर यांनी घटनास्थळ गाठून गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी गोंदियाला हलविले.
केटीएसला आले छावणीचे रूप
भुसारीटोला अपघातातील गंभीर जखमींना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणताच गोंदिया शहरचे ठाणेदार चंद्रप्रकाश सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत व पोलीस अंमलदारांनी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. आरसीबीचे पथक त्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
ओळख पटविण्यासाठी शहर पोलिसांचा खटाटोप
- अपघातातील गंभीर जखमी व केटीएसमध्ये उपचारादरम्यान मृत पावलेल्या दोघांची ओळख पटवून घेण्यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी प्रयत्न केले. गंभीर जखमींच्या फोटो सोशल मीडियावर पाठवून ओळख पटवून घेतली. त्यांच्या नातेवाइकांना शोधण्यात पोलिसांना यश आले. दोन गंभीर जखमींना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे.

ट्रकचा टायर फुटल्याने बिघडले संतुलन
गोंदियावरून कोहमाराकडे धान घेऊन जाणाऱ्या ट्रकचा टायर अचानक फुटल्याने ट्रक चालकाचे संतुलन बिघडले. ट्रक दुसऱ्या बाजूला गेल्याने समोरून येणाऱ्या काळी पिवळीवर धडकला. या अपघातात काळी पिवळीचा चेंदामेंदा झाला. काळी पिवळीचा छत उडाला.
यांच्यावर सुरु आहे उपचार
- या अपघातात गंभीर जखमी असलेले चालक शाकीर अली अब्दुल अली, वनिता भांडारकर, नवेगावबांध येथील टायगर फोर्समध्ये असलेल्या मनीषा चिखलोंडे, दोन अनोळखी पुरुष असून त्यांची ओळख पटली नाही. तर सहावा गंभीर जखमी प्रनोली सतीश राठोड (१५) रा. भुसारीटोला हा गोंदियाच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

 

Web Title: Rushing truck crashes on Kalpivali; Three people were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात