आता दोन रुपयांना मिळणार माचिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 05:00 AM2021-10-27T05:00:00+5:302021-10-27T05:00:26+5:30

दिवसेदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे काटेपेटीच्या कच्च्या मालाचीही दरवाढ झाली आहे. परिणामी, ५ प्रमुख काडेपेटी कंपन्यांनी नुकताच दरवाढीचा निर्णय घेतला आहे. काडेपेटी तयार करण्यासाठी १४ प्रकारचा कच्चा माल लागतो. यात १ किलो फॉस्फरसचे दर ४२५ रुपयांनी वाढून ८१० रुपयांवर पोहोचले आहे. वॅक्सची किंमतही ५८ रुपयांवरून ८० रुपये झाली आहे. शिवाय, अन्य साहित्यांचे दर वधारले असून इंधनाच्या किमत वाढली आहे. 

Now you will get a match for two rupees | आता दोन रुपयांना मिळणार माचिस

आता दोन रुपयांना मिळणार माचिस

googlenewsNext

कपिल केकत 
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सिलिंडरच्या दरवाढीने सर्वच हैराण झालेले असतानाच मागील कित्येक वर्षांपासून एक रुपयाला मिळणारी काटेपेटीही (माचिस) आता महागाईच्या कचाट्यात आली आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून ही दरवाढ लागू होणार असून, ही काडेपेटी दोन रुपयांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, सन २००७ मध्ये म्हणजेच १४ वर्षांपूर्वी काडेपेटीची ५० पैशांनी शेवटची दरवाढ झाली होती  व त्यानंतर काडेपेटी एक रुपयाला विकली जाऊ लागली. मात्र, दिवसेदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे काटेपेटीच्या कच्च्या मालाचीही दरवाढ झाली आहे. परिणामी, ५ प्रमुख काडेपेटी कंपन्यांनी नुकताच दरवाढीचा निर्णय घेतला आहे. काडेपेटी तयार करण्यासाठी १४ प्रकारचा कच्चा माल लागतो. यात १ किलो फॉस्फरसचे दर ४२५ रुपयांनी वाढून ८१० रुपयांवर पोहोचले आहे. वॅक्सची किंमतही ५८ रुपयांवरून ८० रुपये झाली आहे. शिवाय, अन्य साहित्यांचे दर वधारले असून इंधनाच्या किमत वाढली आहे. 

तमिळनाडूत सर्वाधिक उत्पादन 
- काडेपेटीचे उत्पादन तमिळनाडूत होत असून सुमारे चार लाख लोक या उद्योगातून रोजगार कमावतात. यातील तीन लाख लोक प्रत्यक्ष, तर एक लाख लोक अप्रत्यक्षरीत्या या उद्योगाशी जुळले आहेत. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष रोजगारात ९० टक्के महिलांचा समावेश आहे. 
- काडेपेटी उद्योगातून महिलांना दिवसा २४०-२८० रुपये, तर पुरुषांना ३००- ते ३५० रुपये मिळतात. देशात काडेपेटीचे सर्वाधिक उत्पादन तमिळनाडूत होत असून उत्पादन क्षेत्र शिवाकाशी, वीरूधुगर, गुडियाधम व तिरूनेलवेली आहे. 

 डिसेंबरपासून किमती वाढणार 
- काडेपेटी तयार करण्यासाठी १४ प्रकारचा कच्चा माल लागतो. यातील यात १ किलो फॉस्फरसचे दर ४२५ रुपयांनी वाढून ८१० रुपयांवर पोहोचले आहे. वॅक्सची किंमतही ५८ रुपयांवरून ८० रुपये झाली आहे. पेटीसाठी वापरात येणाऱ्या बाहेरील कागदाचे दर २६ रुपयांवरून ५५ रुपये झाले असून आतील कागद ३२ रूपयांवरून ५८ रुपयांनी महागला आहे. शिवाय, इंधन दरवाढीमुळे दळणवळणाचा खर्च वाढल्याने काडेपेटीही भडकली आहे. 

किचनचे बजेट कसे सांभाळायचे ? 
दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असून हजार रुपयांच्या घरात आता सिलिंडर आले आहे. भाजीपाला व  किराणा मालाचे दर वधारल्याने स्वयंपाक घरातील बजेट बिघडले आहे. त्यात आता काडेपेटीही सुटली नसून थेट दुप्पट दरावर आली आहे. शासनाने महागाई नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. 
- स्मिता दखणे (गृृहिणी) 

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वच वस्तूंवर महागाईचे ग्रहण लागले आहे. भाजीपाला व किराणा मालाचे दर भडकल्याने दररोज काय खावे? असा प्रश्न पडतो. त्यात आता एक रुपयाची काडेपेटी महागाईच्या कचाट्यात आली असून दोन रुपयांची होत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यातच आता महागाईचा नागरिकांना फटका बसत आहे.
- श्रद्धा शहारे (गृहिणी) 

दिवाळी तोंडावर असून दररोज काहीना काही वस्तूंचे दर वाढताना दिसत आहे. त्यात आता काडेपेटीचे दर थेट दुपटीने वधारणार आहेत. आधिच पेट्रोल, सिलिंडर, भाजीपाला व किराणा मालाचे दर वधारल्याने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. शासनाने सर्वप्रथम महागाई नियंत्रणात आणली पाहिजे. पण याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.  
- प्रणीता कुळकर्णी (गृहिणी)

 

Web Title: Now you will get a match for two rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.