कामठा मार्गावर ट्रकच्या धडकेत वृध्द महिला जागीच मृत्यू

By कपिल केकत | Published: August 7, 2022 06:24 PM2022-08-07T18:24:28+5:302022-08-07T18:25:12+5:30

Accident Case : रविवारी (दि.७) सकाळी ११.३० वाजतादरम्यान ही घटना घडली असून मीराबाई घनश्याम हरिणखेडे असे मृत महिलेचे नाव आहे.

Elderly woman died on the spot after being hit by a truck on Kamtha road | कामठा मार्गावर ट्रकच्या धडकेत वृध्द महिला जागीच मृत्यू

कामठा मार्गावर ट्रकच्या धडकेत वृध्द महिला जागीच मृत्यू

Next

आमगाव (गोंदिया) : आमगाव- कामठा मार्गावरील ग्राम कट्टीपार जवळील नवेगाव मार्गावर ट्रकच्या धडकेत ६५ वर्षीय वृध्द महिला जागीच ठार झाली. रविवारी (दि.७) सकाळी ११.३० वाजतादरम्यान ही घटना घडली असून मीराबाई घनश्याम हरिणखेडे असे मृत महिलेचे नाव आहे.

कोमल होमेन्द्र हरिणखेडे (२१) ही आजी मीराबाई हरिणखेडे यांच्यासोबत उमरी (मध्यप्रदेश) येथील आत्याच्या घरून दुचाकी क्रमांक एमएच ३५-झेड ९६११ ने खुर्शीपारटोला या स्वगावी परत येत होती. आमगाव-कामठा मार्गावर नवेगाव फाट्याजवळ दुचाकी थांबवून मीराबाई रस्ता विचारण्यासाठी उतरल्या असता आमगाव कडून येणाऱ्या ट्रकने त्यांना धकड दिली व पसार झाला. मीराबाईंना जबर धडक दिल्याने मीराबाई जागेवरच ठार झाल्या. लोकांनी पोलीस व अंबुलन्सला माहिती दिली असता मृतदेह शवविच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. कोमल हरिणखेडे यांच्या तक्रारीवरून भादंवी कलम २७९,३०४ (अ) सहकलम १३५ (अ)(ब) १७७,१८४ नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Elderly woman died on the spot after being hit by a truck on Kamtha road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.