२७ महिन्यापासून पगार न झाल्याने परिचराचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

By नरेश रहिले | Published: May 31, 2023 04:45 PM2023-05-31T16:45:00+5:302023-05-31T16:46:28+5:30

इर्री ग्राम पंचायतमधील घटना: ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे ही आली पाळी

An attendant attempted suicide by poisoning himself due to non-payment for 27 months | २७ महिन्यापासून पगार न झाल्याने परिचराचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

२७ महिन्यापासून पगार न झाल्याने परिचराचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

गोंदिया : तालुक्यातील बहुचर्चीत ग्राम पंचायत इर्री या ग्राम पंचायतीत परिचर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला मागील २७ महिन्यापासून वेतन न दिल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची पाळी आली. उपासमारीने मरण्यापेक्षा विषप्राशन करून आत्महत्याच करावी यासाठी परिचराने चक्क ग्राम पंचायतीच्या आवारात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना ३१ मे रोजी दुपारी घडली. रमेश नान्हू ठकरेले (४८) रा. इर्री असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या परिचराचे नाव आहे. त्याला उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

मागील २७ महिन्यापासून परिचराला वेतन देण्यात आले नाही. ग्रामसेवक नरेश बघेले यांच्या उदासिन धोरणामुळे इर्री ग्राम पंचायत डबघाईस गेली आहे. ग्रामसेवकाने मागील २७ महिन्यापासून परिचाराला वेतन न दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. तुटपुंजे मानधन ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात येते. परंतु त्या तुटपुंज्या मानधनालाही देत नसल्यामुळे त्यांनी हवा खाऊन जगायचे काय असा सवाल ग्राम पंचायत युनियनचे राज्य कार्याध्यक्ष मिलींद गणवीर यांनी केला आहे.

परिचर रमेश नान्हू ठकरेले (४८) रा. इर्री हे आपल्या वेतनासंदर्भात जेव्हा-जेव्हा ग्रामसेवकाला बोलत होते तेव्हा तुला जे बनते ते कर, वेतन देत नाही, कामावरून बंद करू अशी धमकी देत होता. त्यामुळे तणावात आलेल्या रमेश ठकरेले याने विषप्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती नाजूक असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडू असा इशारा महाराष्ट्र राज्य पंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष मिलींद गणवीर यांनी दिला आहे.

Web Title: An attendant attempted suicide by poisoning himself due to non-payment for 27 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.