विद्यार्थ्यांच्या वाहनाला कारची जबर धडक; १३ मुले जखमी, काही किरकोळ तर पाच गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 10:26 PM2022-11-23T22:26:30+5:302022-11-23T22:26:53+5:30

Gadchiroli Newsदेसाईगंज येथील किड्स होम कॉन्व्हेंट तसेच यशोदादेवी इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांना कुरूड या ठिकाणी पोहोचवून देण्यासाठी निघालेल्या चारचाकी वाहनाला (टाटा मॅजिक) समोरून येणाऱ्या कारने जबर धडक दिली.

Students' vehicle hit by car; 13 children were injured, some minor and five seriously | विद्यार्थ्यांच्या वाहनाला कारची जबर धडक; १३ मुले जखमी, काही किरकोळ तर पाच गंभीर

विद्यार्थ्यांच्या वाहनाला कारची जबर धडक; १३ मुले जखमी, काही किरकोळ तर पाच गंभीर

googlenewsNext

गडचिरोलीः देसाईगंज येथील किड्स होम कॉन्व्हेंट तसेच यशोदादेवी इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांना कुरूड या ठिकाणी पोहोचवून देण्यासाठी निघालेल्या चारचाकी वाहनाला (टाटा मॅजिक) समोरून येणाऱ्या कारने जबर धडक दिली. यात १३ मुले जखमी झाली. पाच गंभीर जखमींना उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे नेण्यात आले. हा अपघात बुधवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडला.

वनविभागाचे कार्यालय ते सिंध भवनादरम्यान असलेल्या वळणावर हा अपघात घडला. मुलांना घेऊन जाणारे वाहन (एमएच ३५, पी २२५८) देसाईगंजकडून कुरूडच्या दिशेने जात होते. त्याचवेळी आरमोरीकडून येणाऱ्या भरधाव कारने (सीजी ०४, एमबी ८४८०) मुलांच्या वाहनाला जबरदस्त धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात १३ मुलांना दुखापत झाली. सर्व जखमींना आधी देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ही मुले नेहमीच्या वाहनाने कुरूडकडे निघाले असताना हा अपघात घडला. यात मुलांच्या वाहनाच्या समोरील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. धडक देणाऱ्या कारच्या दोन्ही एअर बॅग बाहेर आल्या. यावरून धडक किती जबरदस्त होती हे लक्षात येते. किरकोळ जखमींना उपचारानंतर सुटी देण्यात आली, तर पाच जणांना पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीला हलविण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर पालकांनी मोठी गर्दी केली होती. मुलांना घेऊन जाणाऱ्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक जणांना बसविले जाते. याकडेही पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. अधिक तपास देसाईगंज पोलिस करीत आहे.

हे विद्यार्थी झाले जखमी

या अपघातात सौम्या बोरकर (आठ वर्ष), श्रीती भूषण कराळे (सात वर्ष), धनश्री विजय पारधी (१४ वर्ष), गुंजन रामचंद्र पारधी (१४ वर्ष), आफरिना जगदीश निहाटे (सात वर्ष), चैतन्य रोहन नंदनवार (१० वर्ष), अथर्व हिरालाल निमजे (आठ वर्ष), राधा अतुल फटिंग (१० वर्ष), खुशबू ईश्वर निहाटे (नऊ वर्ष), गुंजन अतुल फटींग (१२ वर्ष) या विद्यार्थ्यांसह शाहरुख अकबरखा पठाण (२९ वर्ष), सत्यवती मनोज परागकर (४५ वर्ष) हे जखमी झाले आहेत.

Web Title: Students' vehicle hit by car; 13 children were injured, some minor and five seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात