दिवाळीत प्रदूषणाने अस्थमा रुग्णांचा वाढू शकताे त्रास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 05:00 AM2021-10-25T05:00:00+5:302021-10-25T05:00:34+5:30

फटाक्यामध्ये तांबे व कॅडमियमसारखे विषारी घटक असतात. जे हवेत धुलीकण स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावू शकतात. फटाक्याच्या प्रदूषणामुळे दिवाळीच्या कालावधीत सर्वाधिक त्रास अस्थमा व श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांना हाेताे. खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Pollution on Diwali can increase the suffering of asthma patients! | दिवाळीत प्रदूषणाने अस्थमा रुग्णांचा वाढू शकताे त्रास!

दिवाळीत प्रदूषणाने अस्थमा रुग्णांचा वाढू शकताे त्रास!

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : दिवाळी सणाच्या दिवसात फटाक्यामुळे हवा प्रदूषणाचे प्रमाण दुपटीने वाढते. साधारणत: दिवाळी ऑक्टाेबर किंवा नाेव्हेंबर महिन्यात येते. यावेळी हिवाळा असताे. ऋतू बदलानंतर थंडी सुरू हाेते. वातावरणातील दमटपणा व झालेल्या बदलामुळे श्वसनाचे विकार वाढीस लागतात. परिणामी हवेच्या प्रदूषणामुळे या कालावधीत अस्थमा रुग्णांना अधिक त्रास हाेताे.
फटाक्यामध्ये तांबे व कॅडमियमसारखे विषारी घटक असतात. जे हवेत धुलीकण स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावू शकतात. फटाक्याच्या प्रदूषणामुळे दिवाळीच्या कालावधीत सर्वाधिक त्रास अस्थमा व श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांना हाेताे. खबरदारी घेणे गरजेचे आहे.

असे टाळा हवा प्रदूषण
घरे व वाहनातून हाेणाऱ्या धुराचे उत्सर्जन कमीत कमी ठेवावे. फटाक्यांचा वापर जपून करावा किंवा टाळावा. कचरा कचराकुंडीतच टाकावा, कचऱ्याला जाळून त्याची विल्हेवाट लावू नये. थुंकण्यासाठी भांडे किंवा वाहत्या गटारीचा वापर करावा.

फटाके फाेडल्यानंतर त्यातून सल्फर डायऑक्साईट, कार्बन माेनाॅक्साईड, कार्बन डायऑक्साईड व नायट्रेस बाहेर पडतात. याचा सर्वाधिक त्रास अस्थमा व श्वसनाचा आजार असणाऱ्या रुग्णांना हाेताे. लहान मुलांची फुप्फुसे छाेटी असल्याने त्यांना फटाक्याच्या धुराचा  अधिक त्रास हाेताे. प्रदूषित हवेमुळे निमाेनिया व कान तसेच त्वचाराेग बळावतात. मधुमेह रुग्णांना याचा सर्वाधिक धाेका असताे. त्यामुळे अस्थमा, श्वसन व मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी फटाके फुटणाऱ्या स्थळापासून दूर अंतरावर राहावे. प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास हाेत असेल तर संबंधितांनी तातडीने रुग्णालयात जाऊन औषधाेपचार घ्यावा.
- डाॅ. प्रशांत कारेकर, फिजिशियन, गडचिराेली

असे हाेते हवेचे प्रदूषण; दिवाळी सणादरम्यान अनेकांना हाेताे डाेळ्याचा त्रास

-    हवेचे प्रदूषण हाेण्यासाठी चार घटक जबाबदार आहेत. यामध्ये सध्याची नैसर्गिक स्थिती, मानवी लाेकवस्ती, उत्पादनाची व खपाची पातळी तसेच तंत्रज्ञानाचा उपयाेग आदी हाेय.
-    हवा प्रदूषणाचे दाेन गटात वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे नैसर्गिक प्रदूषण व दुसरे म्हणजे मानवी प्रदूषण हाेय. दिवाळी सणादरम्यान वाहन व फटाक्याच्या धुरामुळे प्रदूषण वाढते. यामुळे डाेळ्यांची जळजळ हाेते.

 

Web Title: Pollution on Diwali can increase the suffering of asthma patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.