अन् त्यांनी वाघाच्या तावडीतून शेतकऱ्याला सुखरूप साेडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 05:00 AM2021-10-27T05:00:00+5:302021-10-27T05:00:39+5:30

दबा धरून बसलेल्या वाघाने बाबूराव यांच्यावर झडप घातली. बाबूराव उभे झाले असल्याने त्यांची डाव्या पायाची मांडी वाघाच्या जबड्यात सापडली. वाघाने हल्ला केल्याचे पाहताच जवळच असलेल्या इतर शेतकऱ्यांनी आरडाओरड करत वाघावर काठ्या उगारल्या. त्यामुळे घाबरून वाघाने बाबूराव त्यांना सोडून जंगलाकडे पळ काढला. या हल्ल्यात बाबूराव यांच्या मांडीला वाघाच्या दातांचे व्रण पडून जखमा झाल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Finally, he rescued the farmer from the clutches of the tiger | अन् त्यांनी वाघाच्या तावडीतून शेतकऱ्याला सुखरूप साेडविले

अन् त्यांनी वाघाच्या तावडीतून शेतकऱ्याला सुखरूप साेडविले

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : आपली गुरे चारण्यासाठी जंगलात गेेलेल्या शेतकऱ्यावर एका पट्टेदार वाघाने झडप घातली; पण सोबत असणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी वाघाच्या तावडीतून त्या शेतकऱ्याला सोडवत जीवनदान मिळवून दिले. हा थरार मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून १२ किलोमीटरवर असलेल्या मारकबोडीजवळच्या जंगलात घडला.
बाबूराव ताेदूरवार (६०) रा.मारकबाेडी असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, बाबूराव यांच्यासह गावातील इतर पाच शेतकरी गावाजवळ असलेल्या वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) जंगलात बैलांना चारण्यासाठी नेले हाेते. बैलांना चरण्यासाठी साेडून सहाही जण एका झुडुपाजवळ सावलीत बसले हाेते. काही वेळानंतर बाबूराव हे उठून जाऊ लागले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने बाबूराव यांच्यावर झडप घातली. बाबूराव उभे झाले असल्याने त्यांची डाव्या पायाची मांडी वाघाच्या जबड्यात सापडली. वाघाने हल्ला केल्याचे पाहताच जवळच असलेल्या इतर शेतकऱ्यांनी आरडाओरड करत वाघावर काठ्या उगारल्या. त्यामुळे घाबरून वाघाने बाबूराव त्यांना सोडून जंगलाकडे पळ काढला.
या हल्ल्यात बाबूराव यांच्या मांडीला वाघाच्या दातांचे व्रण पडून जखमा झाल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गडचिरोलीपासून अवघ्या १२ किलोमीटरवर ही घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा दहशत पसरली आहे.

 

Web Title: Finally, he rescued the farmer from the clutches of the tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ