अखेर ४३ दिवसानंतर मिळाले ११ काेटी; तेलंगणाच्या बॅरेजमध्ये गेली आहे जमीन 

By दिगांबर जवादे | Published: June 7, 2023 06:33 PM2023-06-07T18:33:54+5:302023-06-07T18:34:06+5:30

राज्य सरकारने यासाठी ११ काेटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बुधवारी आंदाेलन मागे घेण्यात आले.

Finally got 11 crores after 43 days; Land has gone to barrage in Telangana |  अखेर ४३ दिवसानंतर मिळाले ११ काेटी; तेलंगणाच्या बॅरेजमध्ये गेली आहे जमीन 

 अखेर ४३ दिवसानंतर मिळाले ११ काेटी; तेलंगणाच्या बॅरेजमध्ये गेली आहे जमीन 

googlenewsNext

गडचिराेली : तेलंगणा सरकारच्या वतीने सिराेंचा तालुक्यातील गाेदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा बॅरेजमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी माेबदला मिळावा, यासाठी सिराेंचा तहसील कार्याालयासमाेर साखळी उपाेषण सुरू केले हाेते. ४३ दिवसांपासून आंदाेलन सुरूच हाेते. राज्य सरकारने यासाठी ११ काेटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बुधवारी आंदाेलन मागे घेण्यात आले.

 तेलंगणा सरकाने गाेदावरी नदीवर पाच वर्षांपूर्वी बॅरेज बांधले आहे. या बॅरेजमध्ये सिराेंचा तालुक्यातील काही १२ गावांमधील शेतकऱ्यांची १२८ हेक्टर जमीन गेली आहे. मात्र याचा माेबदला देण्यात आला नाही. तेलंगणा सरकार जर नुकसान देणार नसेल तर महाराष्ट्र शासन याचा माेबदला देईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले हाेते. मात्र अनेक दिवस हाेऊनही माेबदला मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यापासून आंदाेलन सुरू केले हाेते. पैसे देण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे, असे सांगीतले जात हाेते.

 मात्र जाेपर्यंत माेबदला मिळत नाही. ताेपर्यंत आंदाेलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला हाेता. या आंदाेलनाची दखल घेत शेतकऱ्यांंना पहिल्या टप्प्यात ११ काेटी रूपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. उर्वरित २६ काेटी रूपये लवकरच दिले जाणार आहेत. माजी मंत्री तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी सिराेंचा येथे जाऊन आंदाेलकांना लिंबू पाणी पाजले. त्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या इतरही अडचणी जाणून घेतल्या, त्या साेडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शाेभाताई फडणवीस यांनी दिले.


 

Web Title: Finally got 11 crores after 43 days; Land has gone to barrage in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.