आठ भरमार बंदुका केल्या पाेलिसांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 04:42 PM2022-12-06T16:42:34+5:302022-12-06T16:44:14+5:30

पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांचे नक्षल सप्ताहात पोलिसांना सहकार्य

Eight loaded guns were handed over to the police in permili | आठ भरमार बंदुका केल्या पाेलिसांच्या स्वाधीन

आठ भरमार बंदुका केल्या पाेलिसांच्या स्वाधीन

googlenewsNext

गडचिराेली : दिनांक २ ते ८ डिसेंबर या कालावधीत होणा­ऱ्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहदरम्यान पाेलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. अहेरी तालुक्यातील पेरमिली हद्दीतील नागरिकांनी ८ भरमार बंदुका व १ बॅरल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपरिक शेती व्यवसायासोबतच शिकार करून उदरनिर्वाह करीत असत. शिकार करण्यासाठी तसेच वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असत. अशाच प्रकारच्या वडिलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत.

दुर्गम, अतिदुर्गम भागात नक्षलवादी याच बाबींचा फायदा घेऊन, सर्वसामान्य जनतेला नक्षल चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, कुमार चिंता, यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनात नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने जवळच्या पोलिस स्टेशन येथे स्वाधीन कराव्यात, असे आवाहन पाेलिसांनी केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पेरमिली हद्दीतील गट्टेपल्ली, रापल्ले, येरमनार, येरमनार टोला, चंद्रा व कुडकेली गावांतील नागरिकांनी त्यांच्याकडे बाळगलेल्या ८ भरमार बंदुका व १ बॅरल दिनांक ५ डिसेंबर रोजी अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या समक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अहेरी येथे स्वाधीन केल्या.

स्वेच्छेने बंदुका स्वाधीन करणाऱ्यांचा अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यासाठी उपपाेलिस स्टेशनचे पेरमिलीचे प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पोलिस उपनिरीक्षक सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक अजिंक्य जाधव, नाइक पाेलिस शिपाई केशव गुरनुले, पाेलिस शिपाई राहुल खारडे, ब्रिजेश सिडाम, राकेश उरवेते, पंकज दंडिकवार, सुरज करपेत यांनी सहकार्य केले.

इतरांनाही प्रोत्साहित करणार

ज्या काळात बंदुका खरेदी करण्यात आल्या, त्या काळात त्यांची गरज हाेती. आता मात्र कायद्याचे राज्य आले आहे. वन्यजिवांच्या शिकारीवरही बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे भरमार बंदुकांचा उद्देशच संपला आहे. या बंदुकांंसाठी नक्षलवादी दबाव टाकू शकतात. त्यामुळे या बंदुका पाेलिसांकडे परत कराव्यात, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांनी केल्यानंतर ज्यांच्याकडे बंदुका आहेत, त्यांना परत करण्यासाठी सांगू, असे आश्वासन नागरिकांनी दिले.

Web Title: Eight loaded guns were handed over to the police in permili

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.