राजकीय पदावर नसलो तरी जनसेवेसाठी कटिबद्ध राहिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 05:00 AM2021-10-17T05:00:00+5:302021-10-17T05:00:38+5:30

शुक्रवारी सकाळी साईबाबांची पालखी निघाली. यावेळी पालखीच्या मार्गावर अनेक ठिकाणी अम्ब्रिशराव यांचे स्वागत करण्यात आले. काही व्यावसायिकांनी प्रतिष्ठानात त्यांना आमंत्रित करून त्यांच्या हाताने केक कापला. रात्रीच्या पारंपरिक पूजनानंतर राजमहाल परिसरात दसरा महोत्सवासाठी जमलेल्या नागरिकांना त्यांनी मार्गदर्शन केले. कोरोनामुळे सर्वांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली आणि सर्वांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

Although not in a political position, he will remain committed to public service | राजकीय पदावर नसलो तरी जनसेवेसाठी कटिबद्ध राहिल

राजकीय पदावर नसलो तरी जनसेवेसाठी कटिबद्ध राहिल

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : राजकीय पदावर असलो किंवा नसलो तरी या परिसरातील नागरिकांशी माझे नाते आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहीन, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले. कोरोनानंतर यावर्षी झालेल्या येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात ते बोलत होते.
मागील वर्षी कोरोनाचा कहर असल्याने अहेरी इस्टेटचा दसरा मर्यादित स्वरूपात आणि साधेपणाने उरकावा लागला होता. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा दसरा महोत्सव यावर्षी मात्र उत्साहात झाला. राजे अम्ब्रिशराव यांचा वाढदिवस आणि दसरा असा एकत्र योग आल्याने नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. 
शुक्रवारी सकाळी साईबाबांची पालखी निघाली. यावेळी पालखीच्या मार्गावर अनेक ठिकाणी अम्ब्रिशराव यांचे स्वागत करण्यात आले. काही व्यावसायिकांनी प्रतिष्ठानात त्यांना आमंत्रित करून त्यांच्या हाताने केक कापला. 
रात्रीच्या पारंपरिक पूजनानंतर राजमहाल परिसरात दसरा महोत्सवासाठी जमलेल्या नागरिकांना त्यांनी मार्गदर्शन केले. कोरोनामुळे सर्वांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली आणि सर्वांना मोठे नुकसान सहन करावे लागले. लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनावर सर्वांनी मिळून मात करूया आणि कोरोना नावाच्या राक्षसाचा संहार करण्याचा पण घेऊया, असे आवाहन त्यांनी केले. 

२०१ किलोचा केक
दसरा महोत्सवातील मार्गदर्शनानंतर मंचावर वाढदिवस साजरा करण्यात आला. नेत्रदीपक आतषबाजी, मंत्रोपचाराने महोत्सवाची रंगत वाढली. यावेळी तब्बल २०१ किलोचा भलामोठा केक कापण्यात आला. रात्रभर दसरा महोत्सवात पारंपरिक पद्धतीने आदिवासी नृत्यांचे सादरीकरण सुरू होते. यावेळी मंचावर राणी रुक्मिणीदेवी, कुमार रामेश्वररावबाबा, कुमार अवधेशरावबाबा, कुमार चित्तेश्वररावबाबा आणि कुमार प्रवीणरावबाबा तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिक आणि अहेरीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

 

Web Title: Although not in a political position, he will remain committed to public service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dasaraदसरा