लाच स्वीकारून तलाठ्यांने फिल्मी स्टाईलने ठोकली धूम; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:28 AM2023-03-30T11:28:41+5:302023-03-30T11:29:01+5:30

याप्रकरणी तलाठी सुरज रंगनाथ नळे व खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण या दोघांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

By accepting the bribe, the Talathas hit the Dhoom in a filmy style; A case has been registered against both, Solapur | लाच स्वीकारून तलाठ्यांने फिल्मी स्टाईलने ठोकली धूम; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

लाच स्वीकारून तलाठ्यांने फिल्मी स्टाईलने ठोकली धूम; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

- मल्लिकार्जुन देशमुख

मंगळवेढा : मंगळवेढा प्रांत कार्यालयात हायवेच्या भूसंपादन मोबदला वाटपाचे काम पाहणाऱ्या  तलाठी सुरज रंगनाथ नळे यांने ७ हजार रुपयांची लाच घेतली असून त्याने लाचेची रक्कम घेऊन घटनास्थळावरून फिल्मी स्टाईलने धूम ठोकली आहे.  दरम्यान खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण यास एसीबीने गजाआड केले आहे. याप्रकरणी तलाठी सुरज रंगनाथ नळे व खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण या दोघांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

या लाचखोरीत वरिष्ठ अधिकारी  कोण कोण सामील आहेत हे तलाठी नळे याच्या अटकेनंतर समोर येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील तक्रार याने मित्राच्या शेतजमिनीमधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ सांगली-सोलापूर असा महामार्ग गेलेला असून त्यामध्ये शेतजमिनीमध्ये असलेली पाईपलाईन बाधित झाली आहे.त्यामुळे सदर पाईपलाईनची शासकीय नुकसान भरपाई १,४३,७९४/- रुपये मंजूर झाले असून सदर नुकसान भरपाई मिळने करिता तक्रारदार त्यांच्या मित्राच्या वतीने पाठपुरावा करीत होता. यातील आरोपी खाजगी इसम चव्हाण याने आरोपी सूरज नळे यांच्या वतीने लाचेची मागणी केली.

आरोपी सूरज नळे यांनी तडजोडीअंती ७ हजार रुपये लाचेची मागणी करून सापळा कारवाई दरम्यान  सदर लाच रक्कम रुपये ७ हजार रुपये आरोपी सुरज नळे याने स्वीकारून त्यांच्या चार चाकी वाहनातून पळून गेला आहे. त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आला नसून आरोपी पंकज चव्हाण यांला त्याच्या राहते निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलीस अंमलदार मुल्ला, घाडगे, सण्णके, उडाणशिव सर्व अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली आहे.

Web Title: By accepting the bribe, the Talathas hit the Dhoom in a filmy style; A case has been registered against both, Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.